- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- निर्गम २५:३सुमारे इ.स.पू. १४९१
“त्यांच्यापासून तू जी अर्पणे स्वीकारावी ती ही आहेत: “सोने, चांदी आणि कास्य;
- निर्गम २५:४सुमारे इ.स.पू. १४९१
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग, बोकडाचे केस;
- निर्गम २५:५सुमारे इ.स.पू. १४९१
लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;
- निर्गम २५:६सुमारे इ.स.पू. १४९१
दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;
- निर्गम २५:७सुमारे इ.स.पू. १४९१
एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.
- निर्गम २५:८सुमारे इ.स.पू. १४९१
“मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे.
- निर्गम २५:९सुमारे इ.स.पू. १४९१
हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.
- निर्गम २५:१०सुमारे इ.स.पू. १४९१
“त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार करावा—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच.
- निर्गम २५:११सुमारे इ.स.पू. १४९१
त्याला आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याच्याभोवती सोन्याचा काठ करावा.
- निर्गम २५:१२सुमारे इ.स.पू. १४९१
त्यासाठी सोन्याच्या चार कड्या बनवून कोशाच्या चार पायांना, दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्या बाजूला अशा त्या बसवाव्यात.
- निर्गम २५:१३सुमारे इ.स.पू. १४९१
मग बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण द्यावे.
- निर्गम २५:१४सुमारे इ.स.पू. १४९१
कोश वाहून नेण्यासाठी ते दांडे दोन्ही बाजूंच्या कड्यात घालाव्या.
- निर्गम २५:१५सुमारे इ.स.पू. १४९१
या दांड्या कोशाच्या कड्यातच असाव्यात; त्या काढू नये.
- निर्गम २५:१६सुमारे इ.स.पू. १४९१
मग कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार, त्या तू कोशाच्या आत ठेवाव्यात.
- निर्गम २५:१७सुमारे इ.स.पू. १४९१
“प्रायश्चिताचे झाकण शुद्ध सोन्याचे बनवावे—ते अडीच हात लांब व दीड हात रुंद असावे.
- निर्गम २५:१८सुमारे इ.स.पू. १४९१
मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत.
- निर्गम २५:१९सुमारे इ.स.पू. १४९१
एका बाजूस एक करूब आणि दुसर्या बाजूस दुसरे करूब असावे; ते करूब झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घ्यावे.
- निर्गम २५:२०सुमारे इ.स.पू. १४९१
या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादले जावे. करुबाचे मुख समोरासमोर असून, त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे असावी.
- निर्गम २५:२१सुमारे इ.स.पू. १४९१
हे प्रायश्चिताचे झाकण कोशाच्या वर ठेवावे आणि कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार त्या कोशाच्या आत ठेवाव्यात.
- निर्गम २५:२२सुमारे इ.स.पू. १४९१
तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.
- निर्गम २५:२३सुमारे इ.स.पू. १४९१
“बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनवा; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच असावा.
- निर्गम २५:२४सुमारे इ.स.पू. १४९१
त्याला शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे आणि त्याभोवती सोन्याचा काठ करावा.
- निर्गम २५:२५सुमारे इ.स.पू. १४९१
मेजाच्या सभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून त्यावर सोन्याचा काठ करावा.
- निर्गम २५:२६सुमारे इ.स.पू. १४९१
मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या कराव्यात आणि त्या चार पायांच्या चार कोपर्यांवर लावाव्या.
- निर्गम २५:२७सुमारे इ.स.पू. १४९१
मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ असाव्यात.