मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम २५:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    दांडे बाभळीच्या लाकडाचे असावेत, त्यांना सोन्याचे आवरण द्यावे आणि मेज वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग करावा.

  2. निर्गम २५:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील ताटे, पात्रे, तसेच त्याचे कलश व वाट्या हे शुद्ध सोन्याचे असावे.

  3. निर्गम २५:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या मेजावर माझ्यासमोर समक्षतेची भाकर नेहमी ठेवलेली असावी.

  4. निर्गम २५:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    “शुद्ध सोन्याचा एक दीपस्तंभ बनवा. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून कराव्या आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असावीत.

  5. निर्गम २५:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाव्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला.

  6. निर्गम २५:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे.

  7. निर्गम २५:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले त्याच्या कळ्या व फुले बनवावे.

  8. निर्गम २५:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी असावी, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस, आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली असावी; सर्व मिळून सहा फांद्या असाव्या.

  9. निर्गम २५:३६सुमारे इ.स.पू. १४९१

    या सर्व कळ्या व फांद्या शुद्ध सोन्याच्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून असाव्या.

  10. निर्गम २५:३७सुमारे इ.स.पू. १४९१

    “मग त्याचे सात दिवे तयार करून ते दीपस्तंभावर असे ठेवावे की त्यांचा प्रकाश त्यांच्यासमोर पडेल.

  11. निर्गम २५:३८सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांच्या वातीचे चिमटे व ते ठेवण्याची तबके शुद्ध सोन्याची असावी.

  12. निर्गम २५:३९सुमारे इ.स.पू. १४९१

    दीपस्तंभ व इतर उपकरणांसाठी एक तालांत शुद्ध सोन्याचा उपयोग करावा.

  13. निर्गम २५:४०सुमारे इ.स.पू. १४९१

    मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे बनवावे.”

  14. निर्गम २६:१सुमारे इ.स.पू. १४९१

    “निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार करावा, त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावे.

  15. निर्गम २६:२सुमारे इ.स.पू. १४९१

    सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात असावी.

  16. निर्गम २६:३सुमारे इ.स.पू. १४९१

    पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व इतर पाच पडद्यांचेही तसेच करावे.

  17. निर्गम २६:४सुमारे इ.स.पू. १४९१

    जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनवावे आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच करावे.

  18. निर्गम २६:५सुमारे इ.स.पू. १४९१

    एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत पन्नास फासे करावे, हे फासे समोरासमोर असावेत.

  19. निर्गम २६:६सुमारे इ.स.पू. १४९१

    मग सोन्याचे पन्नास आकडे तयार करावेत आणि त्याचा उपयोग पडद्यांना एकत्र जोडण्यासाठी करावा की निवासमंडप अखंड होईल.

  20. निर्गम २६:७सुमारे इ.स.पू. १४९१

    “निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत.

  21. निर्गम २६:८सुमारे इ.स.पू. १४९१

    सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात. असावी.

  22. निर्गम २६:९सुमारे इ.स.पू. १४९१

    पाच पडदे एकत्र व इतर सहा पडदे एकत्र असे जोडावेत. सहावा पडदा मंडपाच्या पुढील बाजूस दुमडावा.

  23. निर्गम २६:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्‍या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा.

  24. निर्गम २६:११सुमारे इ.स.पू. १४९१

    मग कास्याचे पन्नास आकडे करावेत आणि ते फासात घालून असे जोडावे की तंबू एकजोड होईल.

  25. निर्गम २६:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    तंबूच्या पडद्याचा उरलेला भाग, म्हणजे जो अर्धा पडदा उरतो, तो निवासमंडपाच्या मागच्या बाजूस टांगलेला असू द्यावा.