मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम २३:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    पण एका वर्षातच मी त्यांना घालवून देणार नाही, कारण देश ओसाड होईल आणि वनपशू तुमच्यासाठी पुष्कळ होतील.

  2. निर्गम २३:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमची संख्या वाढून तुम्ही त्या देशाचा ताबा घेईपर्यंत थोडेथोडे असे मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देईन.

  3. निर्गम २३:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    “तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत व वाळवंटापासून फरात नदीपर्यंत मी तुमची सीमा स्थापित करेन. त्या देशात राहणारे लोक मी तुमच्या हाती देईन आणि तुम्ही त्यांना आपल्या पुढून घालवून टाकाल.

  4. निर्गम २३:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांच्याशी किंवा त्यांच्या दैवतांशी करार करू नये.

  5. निर्गम २३:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नये, नाहीतर ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतील, कारण त्यांच्या दैवतांची उपासना करणे तुमच्यासाठी खचितच पाश असे होईल.”

  6. निर्गम २४:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेहने मोशेला म्हटले, “तू आणि अहरोन, नादाब आणि अबीहू व इस्राएलींचे सत्तर वडील याहवेहकडे वर या. तुम्ही दुरूनच उपासना करावी,

  7. निर्गम २४:२सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु मोशेने एकटेच याहवेहजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये. लोकांनी त्यांच्याबरोबर वर येऊ नये.”

  8. निर्गम २४:३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशेने जाऊन याहवेहचे शब्द व नियम लोकांना सांगितले, त्यांनी एका आवाजात प्रतिसाद देत म्हटले, “याहवेहने जे सर्वकाही सांगितले त्याप्रमाणे आम्ही करू.”

  9. निर्गम २४:४सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेहने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व त्याने लिहून ठेवले. दुसर्‍या दिवशी अगदी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा गोत्रानुसार बारा खांब उभे केले.

  10. निर्गम २४:५सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्याने इस्राएलचे तरुण पुरुष पाठविले व त्यांनी याहवेहला होमार्पणे व गोर्‍हे अर्पून शांत्यर्पण केले.

  11. निर्गम २४:६सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशेने त्यातील अर्धे रक्त वाटीत घेतले व अर्धे वेदीवर शिंपडले.

  12. निर्गम २४:७सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशेने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांपुढे वाचला. त्यांनी प्रतिसाद दिला, “याहवेहने सांगितले ते सर्वकाही आम्ही करू; आम्ही आज्ञापालन करू.”

  13. निर्गम २४:८सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशेने रक्त घेतले, लोकांवर शिंपडले आणि म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, जो याहवेहने त्यांच्या वचनानुसार तुमच्याबरोबर केला आहे.”

  14. निर्गम २४:९सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले.

  15. निर्गम २४:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते.

  16. निर्गम २४:११सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु त्या इस्राएलाच्या वडिलांविरुद्ध परमेश्वराने आपला हात उगारला नाही; त्यांनी परमेश्वराला पाहिले आणि त्यांनी खाणेपिणे केले.

  17. निर्गम २४:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू पर्वतावर माझ्याकडे ये आणि येथेच राहा आणि लोकांसाठी सूचना म्हणून नियम आणि आज्ञा ज्या मी दगडी पाट्यांवर लिहिल्या आहेत त्या मी तुला देईन.”

  18. निर्गम २४:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे व त्याचा मदतनीस यहोशुआ उठले आणि मोशे पर्वतावर परमेश्वराकडे गेला.

  19. निर्गम २४:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    तो वडीलजनांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत येथेच थांबा, जर कोणाचा काही वाद असला तर त्यांनी अहरोन आणि हूर तुमच्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जावे.”

  20. निर्गम २४:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा मोशे पर्वतावर गेला, मेघांनी पर्वत झाकून गेले,

  21. निर्गम २४:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.

  22. निर्गम २४:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे दिसले.

  23. निर्गम २४:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.

  24. निर्गम २५:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  25. निर्गम २५:२सुमारे इ.स.पू. १४९१

    “इस्राएली लोकांना सांग की, त्यांनी मला अर्पण आणावे. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून ते तू माझ्यावतीने स्वीकारावे.