- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- निर्गम २६:१३सुमारे इ.स.पू. १४९१
तंबूचे पडदे दोन्ही बाजूंनी एकएक हात अधिक लांब असावे; उरलेला पडदा निवासमंडपाला झाकेल असा लोंबत ठेवावा.
- निर्गम २६:१४सुमारे इ.स.पू. १४९१
तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन करावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन करावे.
- निर्गम २६:१५सुमारे इ.स.पू. १४९१
“निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या तयार कराव्यात.
- निर्गम २६:१६सुमारे इ.स.पू. १४९१
प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद असावी.
- निर्गम २६:१७सुमारे इ.स.पू. १४९१
एक फळी दुसर्या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे असावी. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला अशाप्रकारे कुसे बनवावी.
- निर्गम २६:१८सुमारे इ.स.पू. १४९१
निवासमंडपाच्या दक्षिणेस वीस फळ्या बसवाव्यात.
- निर्गम २६:१९सुमारे इ.स.पू. १४९१
आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.
- निर्गम २६:२०सुमारे इ.स.पू. १४९१
निवासमंडपाच्या दुसर्या बाजूला, म्हणजे उत्तरेला वीस फळ्या बनवाव्या
- निर्गम २६:२१सुमारे इ.स.पू. १४९१
आणि प्रत्येक फळीखाली दोन अशा चांदीच्या चाळीस बैठका कराव्या.
- निर्गम २६:२२सुमारे इ.स.पू. १४९१
निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस सहा फळ्या तयार कराव्या,
- निर्गम २६:२३सुमारे इ.स.पू. १४९१
आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्यांसाठी दोन फळ्या तयार कराव्या.
- निर्गम २६:२४सुमारे इ.स.पू. १४९१
या दोन कोपर्यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी जोडीने एकाच कडीत जोडाव्यात; दोन्ही कोपर्यांच्या फळ्या एकसारख्याच असाव्यात.
- निर्गम २६:२५सुमारे इ.स.पू. १४९१
एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका असतील.
- निर्गम २६:२६सुमारे इ.स.पू. १४९१
“बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करा: निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे,
- निर्गम २६:२७सुमारे इ.स.पू. १४९१
निवासमंडपाच्या दुसर्या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे.
- निर्गम २६:२८सुमारे इ.स.पू. १४९१
मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहोचतील असे असावे.
- निर्गम २६:२९सुमारे इ.स.पू. १४९१
फळ्यांना सोन्याचे आवरण लावावे आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या बनवाव्या. आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण द्यावे.
- निर्गम २६:३०सुमारे इ.स.पू. १४९१
“मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे नमुन्याप्रमाणे निवासमंडप तयार करावा.
- निर्गम २६:३१सुमारे इ.स.पू. १४९१
“निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या कातलेल्या रेशमी तागाचा पडदा करून त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावेत.
- निर्गम २६:३२सुमारे इ.स.पू. १४९१
हा पडदा, बाभळीच्या लाकडाचे बनविलेले सोन्याचे आवरण देऊन चांदीच्या बैठकावर उभ्या असलेल्या चार खांबावर चार सोन्याच्या बैठकावर टांगावा.
- निर्गम २६:३३सुमारे इ.स.पू. १४९१
पडदा आकड्यांवर टांगावा आणि कराराचा कोश पडद्यामागे ठेवावा. हा पडदा पवित्रस्थान व परमपवित्रस्थानाची साक्ष वेगळी करेल.
- निर्गम २६:३४सुमारे इ.स.पू. १४९१
प्रायश्चिताचे झाकण परमपवित्रस्थानात कराराच्या कोशावर ठेवावे.
- निर्गम २६:३५सुमारे इ.स.पू. १४९१
निवासमंडपाच्या पडद्याच्या बाहेर उत्तर दिशेला मेज ठेवावा आणि त्यासमोर दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवावा.
- निर्गम २६:३६सुमारे इ.स.पू. १४९१
“निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा बनवावा.
- निर्गम २६:३७सुमारे इ.स.पू. १४९१
या पडद्यासाठी सोन्याचे आकडे आणि सोन्याचे आवरण दिलेले बाभळीच्या लाकडाचे पाच खांब तयार करावेत आणि त्यांच्यासाठी कास्याच्या पाच बैठका तयार कराव्यात.”