मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम २८:५सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी सोन्याचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचा व रेशमी तागाचा वापर करावा.

  2. निर्गम २८:६सुमारे इ.स.पू. १४९१

    “एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा, कुशल कारागिराच्या हातांनी बनवा.

  3. निर्गम २८:७सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याच्या दोन कोपर्‍यांना दोन खांदेपट्ट्या जोडलेल्या असाव्या, म्हणजे ते बांधता येईल.

  4. निर्गम २८:८सुमारे इ.स.पू. १४९१

    कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच असावा; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा असावा.

  5. निर्गम २८:९सुमारे इ.स.पू. १४९१

    “दोन गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावीत.

  6. निर्गम २८:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    एका रत्नावर सहा व दुसर्‍यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार ती असावी.

  7. निर्गम २८:११सुमारे इ.स.पू. १४९१

    मोलवान रत्ने कोरणारे मुद्रेची कोरणी करतात त्याप्रमाणे तू त्या दोन रत्नांवर इस्राएलांच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावी व ती दोन्ही रत्ने सोन्याच्या जाळीदार साच्यात बसवावी.

  8. निर्गम २८:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी.

  9. निर्गम २८:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    सोन्याचे खाचे बनव

  10. निर्गम २८:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या तयार करून खांदेपट्ट्यांवरील आकड्यात अडकवाव्या.”

  11. निर्गम २८:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    “मग निर्णय घेण्यासाठी कुशल कारागिरांकडून ऊरपट तयार करून घ्यावा. एफोदाप्रमाणे सोन्याची जर असलेला, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा असावा.

  12. निर्गम २८:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला असावा व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत असावा.

  13. निर्गम २८:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी;

  14. निर्गम २८:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    दुसर्‍या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे असावे;

  15. निर्गम २८:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    तिसर्‍या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग ही असावीत;

  16. निर्गम २८:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे असावीत. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवावीत.

  17. निर्गम २८:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने असावीत, प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले जावे.

  18. निर्गम २८:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    “ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्या.

  19. निर्गम २८:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावण्यासाठी सोन्याच्या दोन कड्या बनवाव्या.

  20. निर्गम २८:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये घालाव्या,

  21. निर्गम २८:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या.

  22. निर्गम २८:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    सोन्याच्या दोन कड्या तयार कर व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडाव्या.

  23. निर्गम २८:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या.

  24. निर्गम २८:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने, कमरबंदाला जोडतील अशा बांधाव्या, म्हणजे ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.

  25. निर्गम २८:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    “अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल.