मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम २८:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्‍या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.”

  2. निर्गम २८:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    “एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनवावा.

  3. निर्गम २८:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    डोके जाईल असे त्याला मधोमध उघडे ठेवावे. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे विणलेला गोट असावा.

  4. निर्गम २८:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या झग्याच्या खालच्या घेर्‍यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे व त्यामध्ये सोन्याच्या घंट्या बनवाव्या.

  5. निर्गम २८:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    सोन्याच्या घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने झग्याच्या घेराला लावावे.

  6. निर्गम २८:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    अहरोनाने तो झगा सेवा करीत असताना घालावा. जेव्हा तो याहवेहसमोर पवित्रस्थानात जातो व बाहेर येतो त्यावेळी घंट्यांचा आवाज ऐकू येईल, म्हणजे तो मरणार नाही.

  7. निर्गम २८:३६सुमारे इ.स.पू. १४९१

    “शुद्ध सोन्याची एक पाटी तयार करावी आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तशी ही अक्षरे कोरावीत: याहवेहसाठी पवित्र.

  8. निर्गम २८:३७सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि ती जोडता यावी म्हणून ती फेट्याला निळ्या दोरीने बांध.

  9. निर्गम २८:३८सुमारे इ.स.पू. १४९१

    ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”

  10. निर्गम २८:३९सुमारे इ.स.पू. १४९१

    “तलम तागाचा झगा विणून घ्यावा आणि रेशमी तागाचा फेटा तयार करावा. कमरबंद भरतकाम केलेला असावा.

  11. निर्गम २८:४०सुमारे इ.स.पू. १४९१

    अहरोनाच्या पुत्रांचा मान व आदर राखला जावा, म्हणून त्यांच्यासाठी झगे, कमरबंद व टोप्या बनवाव्या.

  12. निर्गम २८:४१सुमारे इ.स.पू. १४९१

    तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांच्या अंगावर ही वस्त्रे घातल्यावर, त्यांचा अभिषेक आणि समर्पण कर. त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र कर.

  13. निर्गम २८:४२सुमारे इ.स.पू. १४९१

    “शरीराला झाकावे म्हणून तागाच्या कापडाचे, कंबरेपासून मांडीपर्यंत पोहोचेल अशी अंतर्वस्त्रे तयार करावी.

  14. निर्गम २८:४३सुमारे इ.स.पू. १४९१

    अहरोन व त्याचे पुत्र ज्यावेळी सभामंडपात येतील किंवा सेवेसाठी वेदीकडे पवित्रस्थानात जातील, त्यावेळी त्यांनी ती वस्त्रे घालावी, म्हणजे ते दोषी ठरून मरणार नाहीत. “अहरोन व त्याच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.”

  15. निर्गम २९:१सुमारे इ.स.पू. १४९१

    “त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी असेच करावे: एक निर्दोष गोर्‍हा व दोन मेंढे घ्यावेत.

  16. निर्गम २९:२सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि उत्तम गव्हाच्या पिठाच्या दोन बेखमीर गोल भाकरी कराव्या, त्या बेखमीर भाकरी आणि जैतुनाचे तेल मिसळून केलेल्या असाव्यात आणि बेखमीर पिठाच्या व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी कराव्या.

  17. निर्गम २९:३सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांना एका टोपलीत घालून, गोर्‍हा आणि दोन मेंढ्यांबरोबर सादर कराव्या.

  18. निर्गम २९:४सुमारे इ.स.पू. १४९१

    मग अहरोन व त्याच्या पुत्रांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणून त्यांना पाण्याने धुवावे;

  19. निर्गम २९:५सुमारे इ.स.पू. १४९१

    वस्त्रे घ्या आणि अहरोनास अंगरखा व त्याबरोबर एफोदाचा झगा, एफोद, ऊरपट हे परिधान करावे. त्यावर कुशलतेने विणलेल्या कमरपट्ट्याने एफोद बांधावा;

  20. निर्गम २९:६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याच्या डोक्यावर फेटा घालावा व त्यास पवित्र मुद्रा जोडून घ्यावी.

  21. निर्गम २९:७सुमारे इ.स.पू. १४९१

    मग अभिषेकाचे तेल घे व त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक करावा.

  22. निर्गम २९:८सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याच्या पुत्रांनाही झगे घालावे.

  23. निर्गम २९:९सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांना फेटे बांधावे. मग अहरोनास व त्याच्या पुत्रांना कमरपट्टे बांधावे. याप्रमाणे याजकत्व कायमचे त्यांचेच असणार. “मग तू अहरोन व त्याच्या मुलांना अभिषेक करावा.

  24. निर्गम २९:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    “मग सभामंडपाच्या समोर गोर्‍हा आणावा व त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याच्या पुत्रांनी आपले हात ठेवावेत.

  25. निर्गम २९:११सुमारे इ.स.पू. १४९१

    सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्‍हा वधावा.