मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम २९:३७सुमारे इ.स.पू. १४९१

    सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र करावी. मग वेदी परमपवित्र होईल व ज्या कशाचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.

  2. निर्गम २९:३८सुमारे इ.स.पू. १४९१

    “दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे.

  3. निर्गम २९:३९सुमारे इ.स.पू. १४९१

    एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.

  4. निर्गम २९:४०सुमारे इ.स.पू. १४९१

    पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस अर्पण करावे.

  5. निर्गम २९:४१सुमारे इ.स.पू. १४९१

    संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.

  6. निर्गम २९:४२सुमारे इ.स.पू. १४९१

    “हे होमार्पण येणार्‍या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन.

  7. निर्गम २९:४३सुमारे इ.स.पू. १४९१

    तिथे मी इस्राएली लोकांना देखील भेटेन आणि ते ठिकाण माझ्या तेजाने पवित्र होईल.

  8. निर्गम २९:४४सुमारे इ.स.पू. १४९१

    “तर मी सभामंडप व वेदी पवित्र करेन आणि अहरोन व त्याचे पुत्र यांना याजक म्हणून माझी सेवा करावी यासाठी पवित्र करेन.

  9. निर्गम २९:४५सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन.

  10. निर्गम २९:४६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांना समजेल की, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले तो मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, यासाठी की, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.”

  11. निर्गम ३०:१सुमारे इ.स.पू. १४९१

    “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार करावी.

  12. निर्गम ३०:२सुमारे इ.स.पू. १४९१

    ती चौरस असावी आणि तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात असावी. तिची शिंगे तिच्याशी अखंड असावी.

  13. निर्गम ३०:३सुमारे इ.स.पू. १४९१

    तिचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याभोवती सोन्याचा काठ करावा.

  14. निर्गम ३०:४सुमारे इ.स.पू. १४९१

    वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या कराव्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या असाव्या.

  15. निर्गम ३०:५सुमारे इ.स.पू. १४९१

    दांडे बाभळीच्या लाकडाचे करून त्याला सोन्याचे आवरण द्यावे.

  16. निर्गम ३०:६सुमारे इ.स.पू. १४९१

    कराराच्या कोशासमोर लावलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूस, प्रायश्चिताचे झाकण जे कराराच्या नियमाच्या पाटींवर आहे; तिथे वेदी ठेवावी; तिथेच मी तुला भेटत जाईन.

  17. निर्गम ३०:७सुमारे इ.स.पू. १४९१

    “रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा.

  18. निर्गम ३०:८सुमारे इ.स.पू. १४९१

    पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्‍या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा.

  19. निर्गम ३०:९सुमारे इ.स.पू. १४९१

    या वेदीवर इतर कोणताही धूप, होमार्पण, अन्नार्पण किंवा पेयार्पण करू नये.

  20. निर्गम ३०:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्‍या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे.”

  21. निर्गम ३०:११सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  22. निर्गम ३०:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    “तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही.

  23. निर्गम ३०:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.

  24. निर्गम ३०:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे.

  25. निर्गम ३०:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये.