मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम २९:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.

  2. निर्गम २९:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ आणि त्यांच्या चरबीसह दोन्ही गुरदे घेऊन ती वेदीवर जाळावी.

  3. निर्गम २९:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु गोर्‍ह्याचे मांस व त्याची विष्ठा व त्याची आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकाव्या. ते पापार्पण आहे.

  4. निर्गम २९:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    “मग त्यातील एक मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.

  5. निर्गम २९:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    मेंढ्याचा वध करावा व त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे.

  6. निर्गम २९:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    मेंढा कापून तुकडे करावेत आणि त्याचे आतील अवयव व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके इतर भागांबरोबर ठेवावे.

  7. निर्गम २९:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    मग संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम कर. तो याहवेहसाठी होमार्पण आहे, ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे.

  8. निर्गम २९:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    “मग दुसरा मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत.

  9. निर्गम २९:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    मेंढ्याचा वध करून, त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्यांना, व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावावे, मग रक्त वेदीच्या सभोवती शिंपडावे.

  10. निर्गम २९:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि वेदीवरील काही रक्त व अभिषेकाचे तेल घे व ते अहरोन व त्याच्या वस्त्रांवर व त्याचे पुत्र व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडावे. मग तो व त्याचे पुत्र आणि त्यांची वस्त्रे पवित्र होतील.

  11. निर्गम २९:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    “मग त्या मेंढ्याची चरबी, त्याचे जाड शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजाची लांब पाळ, दोन्ही गुरदे व त्यावरील चरबी व उजवी मांडी घ्यावी; हा समर्पणाचा मेंढा आहे.

  12. निर्गम २९:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर आहे, त्यातून एक गोल भाकर घे, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घे.

  13. निर्गम २९:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवावे आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी करावी.

  14. निर्गम २९:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    मग ते त्यांच्या हातातून घेऊन होमार्पणाबरोबर वेदीवर जाळावे, याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण असे सादर करावे.

  15. निर्गम २९:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    मग अहरोनाच्या समर्पणाकरिता मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन त्याला ओवाळणीचे अर्पण घेऊन याहवेहसमोर त्याची ओवाळणी कर आणि तो तुझा वाटा राहील.

  16. निर्गम २९:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    “समर्पणाच्या मेंढ्याचे ते भाग म्हणजेच, त्याचे ऊर ज्याची ओवाळणी केली होते व मांडीचा भाग जो सादर केला होता तो अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मालकीचे आहे, ते भाग पवित्र कर.

  17. निर्गम २९:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.

  18. निर्गम २९:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    “अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर त्याच्या वंशजांची व्हावीत अशासाठी की त्यामध्ये त्यांचा अभिषेक व समर्पण व्हावे.

  19. निर्गम २९:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याचा पुत्र जो याजक म्हणून त्याचा वारस होईल आणि सभामंडपात सेवा करण्यासाठी पवित्रस्थानात येईल त्याने ती वस्त्रे सात दिवस अंगात घालावी.

  20. निर्गम २९:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    “समर्पणासाठी असलेला मेंढा घेऊन पवित्र जागी त्याचे मांस शिजवावे.

  21. निर्गम २९:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    मग अहरोन व त्याच्या पुत्रांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात ते मेंढ्याचे मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावी.

  22. निर्गम २९:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांचे समर्पण आणि पवित्रीकरण करण्यासाठी प्रायश्चित्त केलेले अर्पण त्यांनी खावे. परंतु कोणी परक्याने ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे.

  23. निर्गम २९:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि समर्पणाच्या मेंढ्याचे मांस व भाकरीतील काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे.

  24. निर्गम २९:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    “मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी तू करावे, त्यांच्या समर्पणास सात दिवस घ्यावे.

  25. निर्गम २९:३६सुमारे इ.स.पू. १४९१

    पापार्पण म्हणून दररोज तू एक गोर्‍हा प्रायश्चित्तासाठी अर्पण करावा. वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध करावी व ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा.