मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम ३०:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”

  2. निर्गम ३०:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  3. निर्गम ३०:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    “तू कास्याचे गंगाळ व त्याची कास्याची बैठक तयार करावी. ते सभामंडप व वेदीच्या मध्ये ठेवून त्यात पाणी भरावे

  4. निर्गम ३०:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्यातील पाण्याने आपले हात व पाय धुवावे.

  5. निर्गम ३०:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात,

  6. निर्गम ३०:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी आपले हात व पाय धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत. हा नियम अहरोन व त्याच्या येणार्‍या वंशाच्या प्रत्येक पिढीसाठी असावा.”

  7. निर्गम ३०:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  8. निर्गम ३०:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    “पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार हे उत्तम मसाले घे: पाचशे शेकेल गंधरस, त्याच्या अर्धे म्हणजे दोनशे पन्नास शेकेल सुगंधी दालचिनी, दोनशे पन्नास शेकेल सुगंधी वेखंड,

  9. निर्गम ३०:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    पाचशे शेकेल गोलाकार दालचिनी, सर्व पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार, व एक हीन भरून जैतुनाचे तेल.

  10. निर्गम ३०:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल.

  11. निर्गम ३०:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश,

  12. निर्गम ३०:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    मेज व त्याचे सामान, दीपस्तंभ व त्याची उपकरणे, धूपवेदी,

  13. निर्गम ३०:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    होमार्पणाची वेदी, तिची सर्व पात्रे, बैठकासह गंगाळ यांचा अभिषेक करण्यासाठी करावा.

  14. निर्गम ३०:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    ते तू पवित्र करावे म्हणजे ते परमपवित्र होतील आणि ज्याला त्यांचा स्पर्श होईल ते पवित्र होईल.

  15. निर्गम ३०:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    “याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून त्यांना पवित्र कर.

  16. निर्गम ३०:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएली लोकांना सांग, ‘येणार्‍या पिढ्यांपर्यंत हे माझे पवित्र अभिषेकाचे तेल असावे.

  17. निर्गम ३०:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    इतर कोणत्याही मनुष्याच्या शरीरावर ते ओतू नये आणि या मिश्रणाचा वापर करून दुसरे तेल बनवू नये. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला पवित्र मानावे.

  18. निर्गम ३०:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    जे कोणी याप्रकारे तेल तयार करेल आणि याजका व्यतिरिक्त इतर कोणाला लावेल, ते आपल्या लोकांतून काढून टाकले जातील.’ ”

  19. निर्गम ३०:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले, “गंधरस, जटामांसी व गंधाबिरुजा व शुद्ध ऊद हे सुगंधी मसाले घे, हे सर्व समान प्रमाणात असावे,

  20. निर्गम ३०:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे सुगंधी धूप बनव. तो मीठ घातलेला, शुद्ध आणि पवित्र असावा.

  21. निर्गम ३०:३६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यातील काही कुटून त्याची बारीक भुकटी करावी व ती सभामंडपातील कराराच्या नियमाच्या कोशापुढे ठेवावी, जिथे मी तुला भेटत जाईन. ती तुमच्यासाठी परमपवित्र असावी.

  22. निर्गम ३०:३७सुमारे इ.स.पू. १४९१

    या मिश्रणाचा वापर करून स्वतःसाठी धूप तयार करू नये; याहवेहसाठी तो पवित्र मानला जावा.

  23. निर्गम ३०:३८सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या सुगंधाचा आनंद घेण्यासाठी जो कोणी याप्रकारचा धूप बनवेल, त्याला आपल्या लोकांतून काढून टाकले जावे.”

  24. निर्गम ३१:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  25. निर्गम ३१:२सुमारे इ.स.पू. १४९१

    “पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे.