मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम ३२:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    तर आता माझ्या आड येऊ नकोस. माझा राग मी त्यांच्याविरुद्ध भडकवीन आणि मी त्यांचा नाश करेन. मग मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन.”

  2. निर्गम ३२:११सुमारे इ.स.पू. १४९१

    पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा?

  3. निर्गम ३२:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    इजिप्तच्या लोकांनी असे का म्हणावे की, याहवेहने त्यांना डोंगरात मारून टाकावे व या पृथ्वीतून नाहीसे करावे अशा दुष्ट हेतूने बाहेर काढले? आपल्या तीव्र कोपापासून माघार घ्या; सौम्य व्हा आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणू नका.

  4. निर्गम ३२:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    आपले सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांची आठवण करा, ज्यांच्याशी आपण स्वतःच्या नावाने शपथ घेतलीः ‘मी तुझे वंशज आकाशातील तार्‍यांइतके करेन, आणि त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे हा सर्व देश मी त्यांच्या वंशजांना देईन, आणि तो सदासर्वकाळासाठी त्यांचे वतन राहील.’ ”

  5. निर्गम ३२:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा याहवेहने त्याविषयी अनुताप केला व जी विपत्ती आपल्या लोकांवर आणण्याचे म्हटले होते ती आणली नाही.

  6. निर्गम ३२:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यांवर दोन्ही बाजूंनी, मागे व पुढे लेख कोरलेले होते.

  7. निर्गम ३२:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या पाट्या परमेश्वराची कृती होती; तो लेख परमेश्वराची लेखणी होती, जी पाट्यांवर कोरलेली होती.

  8. निर्गम ३२:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा यहोशुआने लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकला, तो मोशेला म्हणाला, “छावणीत युद्धाचा आवाज आहे.”

  9. निर्गम ३२:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशेने उत्तर दिले: “हा आवाज विजयाचा नाही, तो आवाज पराजयाचाही नाही; मला गाण्याचा आवाज ऐकू येत आहे.”

  10. निर्गम ३२:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा मोशे छावणीजवळ आला आणि वासरू व नृत्य पाहिले, तेव्हा त्याचा राग पेटला आणि आपल्या हातातील पाट्या फेकून, डोंगराच्या पायथ्याशी फोडून त्यांचा चुराडा केला.

  11. निर्गम ३२:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि त्याने ते वासरू घेतले जे लोकांनी घडविले होते व ते अग्नीत जाळून टाकले; मग त्याने त्याची कुटून बारीक पूड केली, ती पाण्यात विरघळून इस्राएलच्या लोकांना प्यायला दिली.

  12. निर्गम ३२:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे अहरोनाला म्हणाला, “या लोकांनी तुला काय केले, म्हणून तू त्यांना एवढ्या मोठ्या पापात आणले?”

  13. निर्गम ३२:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामी, क्रोधित होऊ नको, तुला माहीत आहे की हे लोक कसे दुष्टतेकडे प्रवृत्त होतात.

  14. निर्गम ३२:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    ते मला म्हणाले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.’

  15. निर्गम ३२:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘ज्यांच्याकडे सोन्याचे दागिने आहेत ते त्यांनी काढावे.’ मग त्यांनी ते सोने मला दिले, आणि मी ते अग्नीत टाकले, आणि त्यातून हे वासरू बाहेर आले.”

  16. निर्गम ३२:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशेने पाहिले की, लोक मोकाट सुटले आहेत आणि त्यांच्या शत्रूंसमोर एक चेष्टेचे कारण बनावे असे अहरोनाने त्यांना मोकळे सोडले आहे.

  17. निर्गम ३२:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला व म्हणाला, “जे कोणी याहवेहच्या पक्षाचे आहे, त्यांनी माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवीचे सर्व लोक त्याच्याकडे आले.

  18. निर्गम ३२:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे त्यांना म्हणाला, “याहवेह इस्राएलांचे परमेश्वर असे म्हणतात: ‘प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधावी. छावणीतून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत फिरत, प्रत्येकाने आपला भाऊ आणि मित्र व शेजारी यांना जिवे मारून टाकावे.’ ”

  19. निर्गम ३२:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे लेवीच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अंदाजे तीन हजार लोक मरण पावले.

  20. निर्गम ३२:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा मोशे म्हणाला, “आज तुम्ही याहवेहसाठी वेगळे केले गेले आहात आणि याहवेहने आज तुम्हाला आशीर्वाद दिला आहे, कारण तुम्ही आपले पुत्र, भाऊ यांच्याविरुद्ध गेलात.”

  21. निर्गम ३२:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    मग दुसर्‍या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही मोठे पाप केले आहे, पण आता मी वर याहवेहकडे जाईन; कदाचित मी तुमच्या पापासाठी प्रायश्चित करू शकेन.”

  22. निर्गम ३२:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे याहवेहकडे परत गेला आणि म्हणाला, “अरेरे, या लोकांनी केवढे मोठे पाप केले आहे! त्यांनी आपल्या स्वतःसाठी सोन्याचे दैवत केले आहेत.

  23. निर्गम ३२:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु आता कृपा करून त्यांच्या पापांची क्षमा करा—नाहीतर जे पुस्तक तुम्ही लिहिले आहे, त्यातून माझे नाव मिटवून टाका.”

  24. निर्गम ३२:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “ज्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, त्यांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून मिटवून टाकीन.

  25. निर्गम ३२:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    आता जा आणि ज्या ठिकाणाविषयी मी बोललो त्याकडे लोकांना चालव आणि माझा दूत तुमच्यापुढे जाईल. तथापि, जेव्हा शिक्षा करण्याची वेळ येईल, तेव्हा मी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देईन.”