- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- निर्गम ३१:३सुमारे इ.स.पू. १४९१
व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—
- निर्गम ३१:४सुमारे इ.स.पू. १४९१
सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी;
- निर्गम ३१:५सुमारे इ.स.पू. १४९१
आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी.
- निर्गम ३१:६सुमारे इ.स.पू. १४९१
त्याचप्रमाणे, त्याला मदत करण्यासाठी दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब याला मी नेमले आहे.
- निर्गम ३१:७सुमारे इ.स.पू. १४९१
“जसे सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश व त्यावरील प्रायश्चिताचे झाकण, आणि तंबूचे इतर सर्व साहित्य:
- निर्गम ३१:८सुमारे इ.स.पू. १४९१
मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, व धूपवेदी,
- निर्गम ३१:९सुमारे इ.स.पू. १४९१
होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक.
- निर्गम ३१:१०सुमारे इ.स.पू. १४९१
तसेच विणलेली वस्त्रे, अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे, व याजक म्हणून सेवा करतात तेव्हा त्याच्या पुत्रांसाठी वस्त्रे,
- निर्गम ३१:११सुमारे इ.स.पू. १४९१
अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी धूप.
- निर्गम ३१:१२सुमारे इ.स.पू. १४९१
मग याहवेह मोशेला म्हणाले,
- निर्गम ३१:१३सुमारे इ.स.पू. १४९१
“इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत. येणार्या पिढ्यांपर्यंत हे माझ्या व तुमच्यामध्ये चिन्ह राहील, यासाठी की तुम्ही जाणावे की जो तुम्हाला पवित्र करतो, तो मीच याहवेह आहे.
- निर्गम ३१:१४सुमारे इ.स.पू. १४९१
“ ‘शब्बाथ दिवस पाळावा, कारण तो तुम्हासाठी पवित्र आहे; जो कोणी तो अपवित्र करेल त्याला जिवे मारावे; जे कोणी त्या दिवशी काम करतील, त्यांना त्यांच्या लोकांतून काढून टाकले जावे.
- निर्गम ३१:१५सुमारे इ.स.पू. १४९१
सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस हा विसाव्याचा शब्बाथ आणि याहवेहसाठी पवित्र आहे; शब्बाथ दिवशी जो काम करेल त्याला जिवे मारावे.
- निर्गम ३१:१६सुमारे इ.स.पू. १४९१
इस्राएली लोकांनी निरंतरचा करार म्हणून पिढ्यान् पिढ्या शब्बाथ पाळावा.
- निर्गम ३१:१७सुमारे इ.स.पू. १४९१
तो माझ्यामध्ये व इस्राएली लोकांमध्ये सदासर्वकाळचे चिन्ह असेल, कारण याहवेहने सहा दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि सातव्या दिवशी त्यांनी स्वस्थ राहून विसावा घेतला.’ ”
- निर्गम ३१:१८सुमारे इ.स.पू. १४९१
जेव्हा याहवेहने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले, तेव्हा त्यांनी मोशेला कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या दिल्या, ज्या परमेश्वराच्या बोटाने कोरलेल्या होत्या.
- निर्गम ३२:१सुमारे इ.स.पू. १४९१
मोशेला पर्वतावरून खाली येण्यास उशीर होत आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोना सभोवती गोळा झाले व म्हणाले, “ये, आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.”
- निर्गम ३२:२सुमारे इ.स.पू. १४९१
अहरोनाने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या स्त्रिया, तुमचे पुत्र व तुमच्या कन्यांनी घातलेले कानातील सोन्याचे डूल काढून, ते माझ्याकडे आणा.”
- निर्गम ३२:३सुमारे इ.स.पू. १४९१
म्हणून सर्व लोकांनी ते कानातील सोन्याचे डूल काढून ते अहरोनाकडे आणले.
- निर्गम ३२:४सुमारे इ.स.पू. १४९१
लोकांनी जे अहरोनाच्या हातात दिले, ते घेऊन त्याने हत्याराने कोरून, वासराची ओतीव मूर्ती बनविली. मग ते म्हणाले, “हे इस्राएला, ही तुमचे दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”
- निर्गम ३२:५सुमारे इ.स.पू. १४९१
अहरोनाने जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्याने त्या वासरासमोर एक वेदी बांधली व जाहीर केले, “उद्या याहवेहसाठी एक उत्सव करावयाचा आहे.”
- निर्गम ३२:६सुमारे इ.स.पू. १४९१
म्हणून दुसर्या दिवशी लोक लवकर उठले आणि होमार्पणाचा यज्ञ केला व शांत्यर्पणे आणले. त्यानंतर त्यांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.
- निर्गम ३२:७सुमारे इ.स.पू. १४९१
मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत.
- निर्गम ३२:८सुमारे इ.स.पू. १४९१
मी त्यांना दिलेल्या आज्ञांपासून ते फार लवकरच फिरले आहेत आणि आपल्यासाठी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आहे. त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आहे आणि यज्ञ करून म्हटले आहे, ‘हे इस्राएला, ही तुमची दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले आहे!’ ”
- निर्गम ३२:९सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेह मोशेला पुन्हा म्हणाले, “मी या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत.