मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल २८:२१सुमारे इ.स.पू. १०५६

    जेव्हा ती स्त्री शौलाकडे आली आणि तिने पाहिले की तो फारच हादरून गेला होता, ती म्हणाली, “पाहा, तुझ्या दासीने तुमचा शब्द मानला आणि माझा जीव मुठीत घेऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले.

  2. 1 शमुवेल २८:२२सुमारे इ.स.पू. १०५६

    तर आता माझा शब्द माना, मी तुम्हाला थोडे अन्न वाढते ते खा म्हणजे आपल्या वाटेने जाण्यास तुम्हाला शक्ती असावी.”

  3. 1 शमुवेल २८:२३सुमारे इ.स.पू. १०५६

    तो ते नाकारत म्हणाला, “मी खाणार नाही.” परंतु त्याच्या माणसांनीही त्या स्त्रीबरोबर त्याला आग्रह केला, तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे मानले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला.

  4. 1 शमुवेल २८:२४सुमारे इ.स.पू. १०५६

    त्या स्त्रीच्या घरी एक पुष्ट वासरू होते, ते तिने लवकर कापले. तिने थोडेसे पीठ घेतले, ते मळले आणि खमीर न घालता भाकरी भाजल्या.

  5. 1 शमुवेल २८:२५सुमारे इ.स.पू. १०५६

    नंतर तिने शौल आणि त्याची माणसे यांच्यासमोर ते वाढले आणि त्यांनी ते खाल्ले. नंतर त्याच रात्री ते तिथून निघून गेले.

  6. 1 शमुवेल २९:१सुमारे इ.स.पू. १०५६

    पलिष्ट्यांनी त्यांचे सर्व सैन्य अफेक येथे जमविले आणि इस्राएली सैन्याने त्यांची छावणी येज्रीलच्या झर्‍याजवळ दिली.

  7. 1 शमुवेल २९:२सुमारे इ.स.पू. १०५६

    पलिष्टी सरदार आपआपल्या शंभराच्या आणि हजारांच्या तुकड्यांबरोबर निघाले आणि त्यांच्यामागे दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर चालू लागले.

  8. 1 शमुवेल २९:३सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा पलिष्ट्यांच्या सेनाधिकार्‍यांनी विचारले, “या इब्री लोकांचे येथे काय काम?” आखीशने उत्तर दिले, “हा दावीद नाही काय, जो इस्राएलचा राजा शौल याच्याकडे अधिकारी होता? तो आता एक वर्षाहून अधिक काळ माझ्याबरोबर आहे, आणि त्याने शौलाला सोडले तेव्हापासून आजपर्यंत, मला त्याच्यामध्ये काही दोष सापडला नाही.”

  9. 1 शमुवेल २९:४सुमारे इ.स.पू. १०५६

    परंतु पलिष्ट्यांचे सेनापती आखीशवर रागावले होते आणि ते म्हणाले, “त्या मनुष्याला परत पाठवून दे, म्हणजे जे ठिकाण तू त्याला दिले आहेस तिथे त्याने परत जावे. त्याने आपल्याबरोबर लढाईमध्ये जाऊ नये, नाहीतर लढाई होत असताना तो आपल्याविरुद्ध लढेल. आपल्याच लोकांचे डोके कापण्यापेक्षा, त्याच्या धन्याची कृपा मिळविणे हे किती चांगले असेल?

  10. 1 शमुवेल २९:५सुमारे इ.स.पू. १०५६

    हाच तो दावीद नाही काय, ज्याच्याविषयी नृत्य करताना त्यांनी गाईले: “ ‘शौलाने त्याच्या हजारांना मारले, आणि दावीदाने त्याच्या दहा हजारांना मारले?’ ”

  11. 1 शमुवेल २९:६सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा आखीशने दावीदाला बोलावून म्हटले, “जिवंत याहवेहची शपथ, तू विश्वसनीय आहेस आणि सैन्यामध्ये तू माझ्याबरोबर सेवा करावी यात मला आनंद आहे. ज्या दिवशी तू माझ्याकडे आलास तेव्हापासून आजपर्यंत मला तुझ्यामध्ये काही दोष सापडला नाही, परंतु सरदार तुला अनुमती देत नाहीत.

  12. 1 शमुवेल २९:७सुमारे इ.स.पू. १०५६

    आता तू मागे वळ आणि शांतीने जा; पलिष्टी सरदारांना असंतुष्ट वाटेल असे काहीही करू नकोस.”

  13. 1 शमुवेल २९:८सुमारे इ.स.पू. १०५६

    दावीदाने आखीशला विचारले, “परंतु मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आतापर्यंत आपल्या दासामध्ये काही दोष आढळला आहे काय? माझ्या राजाच्या, मी जाऊन स्वामीच्या शत्रूशी का लढू नये?”

  14. 1 शमुवेल २९:९सुमारे इ.स.पू. १०५६

    आखीशने दावीदाला उत्तर दिले, “मला माहीत आहे तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा आहेस; परंतु पलिष्टी सेनापती म्हणतात, ‘त्याने आमच्याबरोबर युद्धास जाऊ नये.’

  15. 1 शमुवेल २९:१०सुमारे इ.स.पू. १०५६

    तर सकाळी लवकर ऊठ आणि तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत, त्यांच्याबरोबर पहाट होताच निघून जा.”

  16. 1 शमुवेल २९:११सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा दावीद आणि त्याची माणसे पहाटेच उठून पलिष्ट्यांच्या प्रदेशाकडे जाण्यासाठी निघाली आणि पलिष्टी सैन्य येज्रीलपर्यंत गेले.

  17. 1 शमुवेल ३०:१सुमारे इ.स.पू. १०५६

    तिसर्‍या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते,

  18. 1 शमुवेल ३०:२सुमारे इ.स.पू. १०५६

    आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते.

  19. 1 शमुवेल ३०:३सुमारे इ.स.पू. १०५६

    जेव्हा दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली तेव्हा त्यांना दिसून आले की, त्या शहराचा अग्नीने नाश झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले व मुली कैद करून नेलेली आहेत.

  20. 1 शमुवेल ३०:४सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा दावीद आणि त्याची माणसे इतकी मोठ्याने रडली की, आणखी रडण्यास त्यांना शक्ती राहिली नाही.

  21. 1 शमुवेल ३०:५सुमारे इ.स.पू. १०५६

    दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते.

  22. 1 शमुवेल ३०:६सुमारे इ.स.पू. १०५६

    दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.

  23. 1 शमुवेल ३०:७सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा दावीद अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आणा.” तेव्हा अबीयाथारने ते त्याच्याकडे आणले,

  24. 1 शमुवेल ३०:८सुमारे इ.स.पू. १०५६

    आणि दावीदाने याहवेहला विचारले, “छापा टाकलेल्या या लोकांचा मी पाठलाग करू काय? ते माझ्या हाती लागतील काय?” याहवेहने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, ते खात्रीने तुझ्या हाती लागतील आणि त्यांची सुटका करण्यात यश पावशील.”

  25. 1 शमुवेल ३०:९सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्‍याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले.