मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल २७:८सुमारे इ.स.पू. १०५६

    नंतर दावीद आणि त्याच्या माणसांनी गशूरी, गिरजी आणि अमालेकी या लोकांवर छापा टाकला. (पुरातन काळापासून हे लोक शूर शहरापासून इजिप्तपर्यंत वाढत गेलेल्या प्रदेशात राहत होते.)

  2. 1 शमुवेल २७:९सुमारे इ.स.पू. १०५६

    जेव्हा दावीद कोणत्याही प्रांतावर हल्ला करीत असे तो एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत सोडत नसे, परंतु तेथील मेंढरे, गुरे, गाढवे व उंट आणि वस्त्रे यांची लूट घेत असे. नंतर तो आखीशकडे परत आला.

  3. 1 शमुवेल २७:१०सुमारे इ.स.पू. १०५६

    जेव्हा आखीशने विचारले, “आज तुम्ही कोणत्या प्रांतावर स्वारी केली?” दावीद त्याला उत्तर देत असे, “यहूदीयाच्या नेगेव विरुद्ध” किंवा “यरहमेल्यांच्या नेगेव विरुद्ध” किंवा “केनीयांच्या नेगेव विरुद्ध.”

  4. 1 शमुवेल २७:११सुमारे इ.स.पू. १०५६

    त्याने गथ येथे आणण्यासाठी एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नव्हते, कारण त्याला वाटले, “ते आमच्याबद्दल सांगतील आणि म्हणतील, ‘दावीदाने असे केले आहे.’ ” आणि जोपर्यंत तो पलिष्ट्यांच्या सीमेत राहिला तोपर्यंत तो असेच करीत असे.

  5. 1 शमुवेल २७:१२सुमारे इ.स.पू. १०५६

    आखीशने दावीदावर भरवसा ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, “तो आपल्या इस्राएली लोकांच्या दृष्टीत इतका घृणास्पद झाला आहे की, तो आयुष्यभर माझा सेवक म्हणून राहील.”

  6. 1 शमुवेल २८:१सुमारे इ.स.पू. १०५६

    त्या दिवसांमध्ये इस्राएलविरुद्ध युद्ध करावे म्हणून पलिष्ट्यांनी त्यांचे सैन्य एकत्र केले. आखीश दावीदाला म्हणाला, “तू हे खचित समज की, तू आणि तुझी माणसे माझ्याबरोबर सैन्यात येतील.”

  7. 1 शमुवेल २८:२सुमारे इ.स.पू. १०५६

    दावीद म्हणाला, “तर आपला दास काय करू शकतो, हे आपण पाहाल.” आखीशने उत्तर दिले, “फार चांगले, मी तुला आयुष्यभर माझा अंगरक्षक करेन.”

  8. 1 शमुवेल २८:३सुमारे इ.स.पू. १०५६

    शमुवेल तर मरण पावला होता आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्यासाठी शोक केला होता आणि त्याला त्याच्याच रामाह नगरात पुरले होते. शौलाने मृतात्म्यांशी संपर्क साधणारे आणि तंत्रमंत्र करणारे यांना देशातून घालवून दिले होते.

  9. 1 शमुवेल २८:४सुमारे इ.स.पू. १०५६

    पलिष्टी एकत्र आले आणि त्यांनी शूनेम येथे छावणी दिली, तर शौलाने सर्व इस्राएली सैन्याला एकत्र करून गिलबोआ येथे छावणी दिली.

  10. 1 शमुवेल २८:५सुमारे इ.स.पू. १०५६

    जेव्हा शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले, तेव्हा तो घाबरला; त्याचे हृदय भीतीने भरून गेले.

  11. 1 शमुवेल २८:६सुमारे इ.स.पू. १०५६

    शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही.

  12. 1 शमुवेल २८:७सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा शौल त्याच्या सेवकांना म्हणाला, “माझ्यासाठी एक भूतविद्या जाणकार स्त्रीला शोधा की, जी मृतात्म्यांशी संपर्क करते, म्हणजे मी जाऊन तिला विचारेन.” ते म्हणाले, “एक स्त्री एनदोर येथे आहे.”

  13. 1 शमुवेल २८:८सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा शौलाने आपला वेश बदलून वेगळे कपडे घातले आणि दोन माणसे घेऊन रात्रीच्या वेळेस त्या स्त्रीकडे गेला. आणि म्हणाला, “माझ्यासाठी एक आत्म्याला विचार आणि मी ज्याचे नाव सांगतो त्याला माझ्यासाठी वर आण.”

  14. 1 शमुवेल २८:९सुमारे इ.स.पू. १०५६

    परंतु ती स्त्री त्याला म्हणाली, “तुला नक्कीच माहीत आहे की, शौलाने काय केले आहे. चेटकीण आणि तंत्रमंत्र करणाऱ्यांना त्याने या देशातून घालवून टाकले आहे. मी मरावे म्हणून माझ्या जिवासाठी तू सापळा का टाकतोस?”

  15. 1 शमुवेल २८:१०सुमारे इ.स.पू. १०५६

    शौलाने तिला याहवेहची शपथ घातली, “जिवंत याहवेहची शपथ, यासाठी तुला शिक्षा होणार नाही.”

  16. 1 शमुवेल २८:११सुमारे इ.स.पू. १०५६

    तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला वर आणू?” तो म्हणाला, “शमुवेलला वर आण.”

  17. 1 शमुवेल २८:१२सुमारे इ.स.पू. १०५६

    जेव्हा त्या स्त्रीने शमुवेलला पाहिले, तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि शौलाला म्हणाली, “तुम्ही मला का फसविले आहे? तुम्ही शौल आहात!”

  18. 1 शमुवेल २८:१३सुमारे इ.स.पू. १०५६

    शौल राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?” ती स्त्री म्हणाली, “जमिनीतून एक भुतासारखी आकृती वर येताना दिसत आहे.”

  19. 1 शमुवेल २८:१४सुमारे इ.स.पू. १०५६

    “तो कसा दिसतो?” त्याने विचारले. “झगा घातलेला एक वृद्ध पुरुष वर येत आहे,” ती म्हणाली. तेव्हा शौलाने ओळखले की तो शमुवेल होता आणि त्याने स्वतः त्याचे तोंड खाली जमिनीकडे करून दंडवत घातले.

  20. 1 शमुवेल २८:१५सुमारे इ.स.पू. १०५६

    शमुवेल शौलास म्हणाला, “मला वर आणून तू मला का त्रास दिला आहेस?” शौलाने उत्तर दिले, “मी फार मोठ्या संकटात आहे, पलिष्टी माझ्याविरुद्ध लढाई करत आहेत आणि परमेश्वराने मला सोडून दिले आहे. परमेश्वर मला संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नां द्वारे उत्तर देत नाही. यामुळेच मी काय करावे हे तुम्ही मला सांगावे म्हणून मी तुम्हाला बोलाविले आहे.”

  21. 1 शमुवेल २८:१६सुमारे इ.स.पू. १०५६

    शमुवेल म्हणाला, “याहवेहने तुला सोडले आहे आणि ते तुझे शत्रू झाले आहेत, तर तू माझा सल्ला का घ्यावा?

  22. 1 शमुवेल २८:१७सुमारे इ.स.पू. १०५६

    याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्‍यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे.

  23. 1 शमुवेल २८:१८सुमारे इ.स.पू. १०५६

    कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही किंवा अमालेकी लोकांविरुद्ध याहवेहचा क्रोध उगारला नाही, म्हणून याहवेहने आज हे तुझ्यासाठी केले आहे.

  24. 1 शमुवेल २८:१९सुमारे इ.स.पू. १०५६

    याहवेह इस्राएली लोकांना आणि तुला पलिष्ट्यांच्या हाती देणार आहे आणि उद्या तू आणि तुझी मुले माझ्याबरोबर असतील. आणि याहवेह इस्राएलच्या सैन्याला पलिष्ट्यांच्या देईल.”

  25. 1 शमुवेल २८:२०सुमारे इ.स.पू. १०५६

    शौल लगेच तसाच जमिनीवर पडला, शमुवेलने सांगितलेल्या शब्दांमुळे तो फार भयभीत झाला. त्याच्यात काही शक्ती राहिली नाही, कारण त्याने दिवसभर आणि रात्रभर काहीही खाल्ले नव्हते.