Skip to content

Samuel बद्दल बायबलमधील वचने

135 वचने · 22 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. वर्षानुवर्षे हे असेच चालू होते. जेव्हा हन्नाह याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा तिची सवत पनिन्नाह, ती रडेपर्यंत चिडवीत असे आणि मग ती काही खात नसे.

  2. तिचा पती एलकानाह तिला म्हणत असे, “हन्नाह तू का रडत आहेस? तू काही का खात नाहीस? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”

  3. एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता.

  4. तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली.

  5. आणि तिने एक शपथ घेतली, ती म्हणाली, “हे सर्वसमर्थ याहवेह, जर तुम्ही तुमच्या दासीच्या दुर्दशेकडे लक्ष द्याल आणि माझी आठवण कराल आणि तुमच्या दासीला विसरणार नाही परंतु तिला एक पुत्र द्याल, तर मी त्याला त्याच्या आयुष्याचे सर्व दिवस याहवेहसाठी देईन आणि त्याच्या डोक्यावर कधीही वस्तरा फिरणार नाही.”

  6. ती याहवेहकडे प्रार्थना करीत असता, एली तिच्या मुखाकडे पाहत होता.

  7. हन्नाह तिच्या मनात प्रार्थना करीत होती, आणि तिचे ओठ हालत होते, परंतु तिचा आवाज मात्र ऐकू येत नव्हता. एलीला वाटले की ती नशेत आहे

  8. आणि एली तिला म्हणाला, “किती वेळ तू नशेत राहशील? मद्यपान सोडून दे.”

  9. “तसे नाही, माझ्या स्वामी,” हन्नाहने उत्तर दिले, “मी फार त्रस्त झालेली स्त्री आहे. मी द्राक्षारस किंवा मद्य घेतले नाही; मी माझे हृदय याहवेहकडे मोकळे करीत होते.

  10. तुमच्या दासीला दुष्ट स्त्री असे समजू नका; मी या ठिकाणी वेदना आणि तीव्र दुःखाने प्रार्थना करीत आहे.”

  11. तेव्हा एलीने उत्तर दिले, “शांतीने जा, आणि तू जे काही मागितले आहेस, ते इस्राएलचे परमेश्वर तुला देवो.”

  12. ती म्हणाली, “तुमची दासी तुमच्या दृष्टीत कृपा पावो.” नंतर ती आपल्या मार्गाने निघून गेली आणि तिने अन्न सेवन केले आणि त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.

  13. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी उठून याहवेहची उपासना केली आणि परत रामाह येथे आपल्या घरी परतले. एलकानाहने आपली पत्नी हन्नाह हिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि याहवेहने तिची आठवण केली.

  14. तेव्हा नेमलेल्या काळात हन्नाह गर्भवती झाली आणि एका पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले, ती म्हणाली, “कारण याहवेहकडे मी याला मागितले होते,”

  15. तेव्हा हन्नाह गेली नाही. ती तिच्या पतीला म्हणाली, “मुलाचे दूध तोडल्यानंतर, मी त्याला घेऊन जाईन आणि त्याला याहवेहसमोर सादर करेन आणि तो सदैव तिथेच राहील.”

  16. त्याचे दूध तोडल्यानंतर तिने बालकास लहान असतानाच तिच्याबरोबर घेतले, तसेच तीन वर्षाचा बैल, एक एफा सपीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेतला आणि त्याला शिलोह येथे याहवेहच्या मंदिरात आणले.

  17. बैलाचा यज्ञ केल्यानंतर, त्यांनी त्या मुलाला एलीकडे आणले,

  18. आणि हन्ना त्याला म्हणाली, “माझ्या स्वामी, मला क्षमा करा. तुमच्या जीविताची शपथ, मी तीच स्त्री आहे जी येथे तुमच्या बाजूला उभी राहून याहवेहकडे प्रार्थना करीत होती.

  19. या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.

  20. तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली.

  21. तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली: “माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे; याहवेहमध्ये माझे शिंग उंच केलेले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते, कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते.

  22. “याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.

  23. “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या मुखाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.

  24. “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत, परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत.

  25. ज्यांच्याकडे भरपूर होते ते आता अन्नासाठी मजुरी करीत आहेत, परंतु जे भुकेले होते ते आता भुकेले नाहीत. जी अपत्यहीन होती तिने सात लेकरांना जन्म दिला आहे, परंतु जिला अनेक मुले होती ती क्षीण झाली आहे.