Skip to content

Samuel बद्दल बायबलमधील वचने

135 वचने · 22 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शौल लगेच तसाच जमिनीवर पडला, शमुवेलने सांगितलेल्या शब्दांमुळे तो फार भयभीत झाला. त्याच्यात काही शक्ती राहिली नाही, कारण त्याने दिवसभर आणि रात्रभर काहीही खाल्ले नव्हते.

  2. शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.

  3. ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,

  4. द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते.

  5. शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)

  6. दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत.

  7. शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता.

  8. मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते, व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते; यांनी याहवेहचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.

  9. तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!

  10. तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्ट्यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही.