Samuel बद्दल बायबलमधील वचने: Organizes the tabernacle service
Organizes the tabernacle service बद्दल वचने
द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते.
शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)
शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता.