Hannah
Hannah चा उल्लेख असलेली वचने
त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते.
परंतु हन्नेहला तो दुप्पट वाटा देई, कारण त्याची तिच्यावर प्रीती होती, आणि याहवेहने तिचे उदर बंद केले होते.
तिचा पती एलकानाह तिला म्हणत असे, “हन्नाह तू का रडत आहेस? तू काही का खात नाहीस? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”
एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता.
हन्नाह तिच्या मनात प्रार्थना करीत होती, आणि तिचे ओठ हालत होते, परंतु तिचा आवाज मात्र ऐकू येत नव्हता. एलीला वाटले की ती नशेत आहे
“तसे नाही, माझ्या स्वामी,” हन्नाहने उत्तर दिले, “मी फार त्रस्त झालेली स्त्री आहे. मी द्राक्षारस किंवा मद्य घेतले नाही; मी माझे हृदय याहवेहकडे मोकळे करीत होते.
दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी उठून याहवेहची उपासना केली आणि परत रामाह येथे आपल्या घरी परतले. एलकानाहने आपली पत्नी हन्नाह हिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि याहवेहने तिची आठवण केली.
तेव्हा नेमलेल्या काळात हन्नाह गर्भवती झाली आणि एका पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले, ती म्हणाली, “कारण याहवेहकडे मी याला मागितले होते,”
तेव्हा हन्नाह गेली नाही. ती तिच्या पतीला म्हणाली, “मुलाचे दूध तोडल्यानंतर, मी त्याला घेऊन जाईन आणि त्याला याहवेहसमोर सादर करेन आणि तो सदैव तिथेच राहील.”
तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली: “माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे; याहवेहमध्ये माझे शिंग उंच केलेले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते, कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते.
आणि हन्नाहवर याहवेहची कृपा होती; तिने तीन मुलांना आणि दोन मुलींना जन्म दिला. याकाळात शमुवेल बाळ याहवेहच्या उपस्थितीत वाढत गेला.