Skip to content

Samuel बद्दल बायबलमधील वचने

135 वचने · 22 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शमुवेल त्यांना म्हणाला, “याहवेह तुमच्याविरुद्ध साक्षी आहेत आणि आज याहवेहचा अभिषिक्त सुद्धा साक्षी आहे की, माझ्यामध्ये तुम्हाला कोणताही दोष सापडला नाही.” ते म्हणाले, “होय, याहवेह साक्षी आहेत.”

  2. तेव्हा शमुवेलने विचारले, “तू हे काय केले आहेस?” शौलाने उत्तर दिले, “जेव्हा मी पाहिले की, लोक निघून जात आहेत आणि ठरविलेल्या वेळात तुम्ही आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिकमाश येथे जमत होते,

  3. मला वाटले, ‘आता पलिष्टी लोक गिलगाल येथे माझ्याविरुद्ध चाल करून येतील आणि मी अजूनही याहवेहकडून साहाय्यासाठी विनंती केली नाही.’ म्हणून होमार्पण करणे मला भाग पडले.”

  4. शमुवेल शौलास म्हणाला, “तू मूर्खपणा केला आहे, याहवेह तुझ्या परमेश्वरांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही; जर पालन केले असते तर इस्राएलवरील तुझे राज्य याहवेहने सर्वकाळासाठी स्थापले असते.

  5. परंतु आता तुझे राज्य टिकणार नाही; याहवेहने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे आणि आपल्या लोकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले आहे. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही.”

  6. नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती.

  7. जेव्हा दावीद निसटून पळाला तेव्हा तो रामाह येथे शमुवेलकडे गेला आणि शौलाने त्याच्याशी केले ते सर्वकाही त्यांना सांगितले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.

  8. शमुवेल मरण पावला, तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्याच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्याला रामाह येथील त्याच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या वाळवंटात गेला.

  9. शमुवेल तर मरण पावला होता आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्यासाठी शोक केला होता आणि त्याला त्याच्याच रामाह नगरात पुरले होते. शौलाने मृतात्म्यांशी संपर्क साधणारे आणि तंत्रमंत्र करणारे यांना देशातून घालवून दिले होते.

  10. पलिष्टी एकत्र आले आणि त्यांनी शूनेम येथे छावणी दिली, तर शौलाने सर्व इस्राएली सैन्याला एकत्र करून गिलबोआ येथे छावणी दिली.

  11. जेव्हा शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले, तेव्हा तो घाबरला; त्याचे हृदय भीतीने भरून गेले.

  12. शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही.

  13. तेव्हा शौल त्याच्या सेवकांना म्हणाला, “माझ्यासाठी एक भूतविद्या जाणकार स्त्रीला शोधा की, जी मृतात्म्यांशी संपर्क करते, म्हणजे मी जाऊन तिला विचारेन.” ते म्हणाले, “एक स्त्री एनदोर येथे आहे.”

  14. तेव्हा शौलाने आपला वेश बदलून वेगळे कपडे घातले आणि दोन माणसे घेऊन रात्रीच्या वेळेस त्या स्त्रीकडे गेला. आणि म्हणाला, “माझ्यासाठी एक आत्म्याला विचार आणि मी ज्याचे नाव सांगतो त्याला माझ्यासाठी वर आण.”

  15. परंतु ती स्त्री त्याला म्हणाली, “तुला नक्कीच माहीत आहे की, शौलाने काय केले आहे. चेटकीण आणि तंत्रमंत्र करणाऱ्यांना त्याने या देशातून घालवून टाकले आहे. मी मरावे म्हणून माझ्या जिवासाठी तू सापळा का टाकतोस?”

  16. शौलाने तिला याहवेहची शपथ घातली, “जिवंत याहवेहची शपथ, यासाठी तुला शिक्षा होणार नाही.”

  17. तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला वर आणू?” तो म्हणाला, “शमुवेलला वर आण.”

  18. जेव्हा त्या स्त्रीने शमुवेलला पाहिले, तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि शौलाला म्हणाली, “तुम्ही मला का फसविले आहे? तुम्ही शौल आहात!”

  19. शौल राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?” ती स्त्री म्हणाली, “जमिनीतून एक भुतासारखी आकृती वर येताना दिसत आहे.”

  20. “तो कसा दिसतो?” त्याने विचारले. “झगा घातलेला एक वृद्ध पुरुष वर येत आहे,” ती म्हणाली. तेव्हा शौलाने ओळखले की तो शमुवेल होता आणि त्याने स्वतः त्याचे तोंड खाली जमिनीकडे करून दंडवत घातले.

  21. शमुवेल शौलास म्हणाला, “मला वर आणून तू मला का त्रास दिला आहेस?” शौलाने उत्तर दिले, “मी फार मोठ्या संकटात आहे, पलिष्टी माझ्याविरुद्ध लढाई करत आहेत आणि परमेश्वराने मला सोडून दिले आहे. परमेश्वर मला संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नां द्वारे उत्तर देत नाही. यामुळेच मी काय करावे हे तुम्ही मला सांगावे म्हणून मी तुम्हाला बोलाविले आहे.”

  22. शमुवेल म्हणाला, “याहवेहने तुला सोडले आहे आणि ते तुझे शत्रू झाले आहेत, तर तू माझा सल्ला का घ्यावा?

  23. याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्‍यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे.

  24. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही किंवा अमालेकी लोकांविरुद्ध याहवेहचा क्रोध उगारला नाही, म्हणून याहवेहने आज हे तुझ्यासाठी केले आहे.

  25. याहवेह इस्राएली लोकांना आणि तुला पलिष्ट्यांच्या हाती देणार आहे आणि उद्या तू आणि तुझी मुले माझ्याबरोबर असतील. आणि याहवेह इस्राएलच्या सैन्याला पलिष्ट्यांच्या देईल.”