- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1050–1010 BC
Samuel & King Saul
Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.
या कालखंडातील वचने
- 1 शमुवेल २६:८सुमारे इ.स.पू. १०६०
अबीशाई दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझ्या शत्रूला आज तुझ्या हाती दिले आहे. तर आता मला भाल्याने त्याच्यावर एकच वार करून त्याला जमिनीत खुपसून टाकू द्या; दुसर्यांदा वार करावा लागणार नाही.”
- 1 शमुवेल २६:९सुमारे इ.स.पू. १०६०
परंतु दावीद अबीशाईला म्हणाला, “त्याचा वध करू नको! याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकून कोण निर्दोष राहू शकेल?”
- 1 शमुवेल २६:१०सुमारे इ.स.पू. १०६०
दावीद म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह स्वतः त्याला मारतील, किंवा त्याची वेळ येईल आणि त्याचा मृत्यू होईल, किंवा तो युद्धात जाईल आणि त्याचा नाश होईल.
- 1 शमुवेल २६:११सुमारे इ.स.पू. १०६०
परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा असे याहवेह माझ्या हातून घडवून न आणो. तर आता त्याच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण जाऊ या.”
- 1 शमुवेल २६:१२सुमारे इ.स.पू. १०६०
तेव्हा दावीदाने शौलाच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घेतला आणि ते निघून गेले. कोणीही ते पाहिले नाही किंवा कोणाला ते कळले नाही, किंवा कोणी उठले नाही. ते सर्व झोपी गेले होते, कारण याहवेहकडून त्यांना गाढ निद्रा लागली होती.
- 1 शमुवेल २६:१३सुमारे इ.स.पू. १०६०
नंतर दावीद पलीकडे गेला आणि डोंगराच्या उंच टोकावर अंतरावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते.
- 1 शमुवेल २६:१४सुमारे इ.स.पू. १०६०
दावीदाने सैन्याला आणि नेरचा पुत्र अबनेर यांना मोठ्याने विचारले, “अबनेर, तू मला उत्तर देणार नाहीस काय?” अबनेरने उत्तर दिले, “तू कोण आहेस, राजाला कोण हाक मारत आहे?”
- 1 शमुवेल २६:१५सुमारे इ.स.पू. १०६०
दावीद अबनेरास म्हणाला, “तू एक पुरुष आहेस, नाही का? आणि इस्राएलमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? तू तुझा धनी, म्हणजेच राजाचे रक्षण का केले नाहीस? कोणीतरी तुझ्या धनी राजाचा वध करण्यास आला होता.
- 1 शमुवेल २६:१६सुमारे इ.स.पू. १०६०
तू जे केलेस ते चांगले नाही. जिवंत याहवेहची शपथ, तू आणि तुझी माणसे मेलीच पाहिजेत, कारण तू तुझ्या मालकाचे, याहवेहच्या अभिषिक्ताचे रक्षण केले नाहीस. तुझ्या सभोवती पाहा. राजाचा भाला आणि पाण्याचा चंबू जे त्यांच्या उशाशी होते ते कुठे आहेत?”
- 1 शमुवेल २६:१७सुमारे इ.स.पू. १०६०
शौलाने दावीदाचा आवाज ओळखला आणि म्हणाला, “दावीदा माझ्या मुला, हा तुझाच आवाज आहे काय?” दावीदाने उत्तर दिले, “होय, माझे धनी, माझ्या राजा, हा माझाच आवाज आहे.”
- 1 शमुवेल २६:१८सुमारे इ.स.पू. १०६०
आणि तो पुढे म्हणाला, “माझा धनी आपल्या सेवकाचा पाठलाग का करीत आहे? मी काय केले आहे आणि कोणत्या बाबतीत दोषी आहे?
- 1 शमुवेल २६:१९सुमारे इ.स.पू. १०६०
तर आता माझ्या धन्याने, राजाने आपल्या सेवकाचे म्हणणे ऐकावे. जर याहवेहने तुम्हाला माझ्याविरुद्ध चेताविले आहे, तर आपण अर्पण स्वीकारावे. परंतु जर लोकांनी हे केले आहे, तर ते याहवेहसमोर शापित केले जावोत! कारण मला आज याहवेहच्या वतनाचा वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर घालवून म्हटले, ‘जा, इतर दैवतांची सेवा कर.’
- 1 शमुवेल २६:२०सुमारे इ.स.पू. १०६०
आता याहवेहच्या समक्षतेपासून दूर माझे रक्त भूमीवर पडू नये. जसे कोणी डोंगरामध्ये तीतराची शिकार करावी, तसा इस्राएलचा राजा पिसवा शोधायला बाहेर आला आहे.”
- 1 शमुवेल २६:२१सुमारे इ.स.पू. १०६०
तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. दावीदा, माझ्या पुत्रा, परत ये. कारण आज तू माझ्या जिवास मौल्यवान समजलेस, मी पुन्हा तुला इजा करणार नाही. खरोखरच मी मूर्खासारखा वागलो आणि फार चुकीचे वागलो.”
- 1 शमुवेल २६:२२सुमारे इ.स.पू. १०६०
दावीदाने उत्तर दिले, “हा पाहा, राजाचा भाला, तुमच्या तरुण पुरुषांपैकी एकाने इकडे येऊन तो घेऊन जा.
- 1 शमुवेल २६:२३सुमारे इ.स.पू. १०६०
याहवेह प्रत्येकाला आपआपल्या नीतिमत्तेचे व विश्वासूपणाचे प्रतिफळ देवो. याहवेहने आज तुम्हाला माझ्या हाती दिले होते, परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकणार नाही.
- 1 शमुवेल २६:२४सुमारे इ.स.पू. १०६०
जसा आज तुमचा जीव मला मोलाचा वाटला, तसेच याहवेहला माझाही जीव मोलाचा वाटो आणि ते सर्व संकटांपासून मला वाचवो.”
- 1 शमुवेल २६:२५सुमारे इ.स.पू. १०६०
तेव्हा शौल दावीदास म्हणाला, “दावीदा, माझ्या मुला, तू आशीर्वादित होशील; तू महान गोष्टी करशील आणि खात्रीने विजयी होशील.” तेव्हा दावीद त्याच्या मार्गाने निघून गेला आणि शौल घरी परतला.
- 1 शमुवेल २७:१सुमारे इ.स.पू. १०५८
परंतु दावीदाने आपल्या मनात म्हटले, “कधी तरी मी शौलाच्या हातून मरणारच आहे. पलिष्ट्यांच्या देशात पळून जाणे उत्तम आहे. मग शौल इस्राएलमध्ये माझा शोध करण्याचे सोडून देईल आणि मी त्याच्या हातातून निसटून जाईन.”
- 1 शमुवेल २७:२सुमारे इ.स.पू. १०५८
तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे माणसे गथ नगराचा राजा माओकचा पुत्र आखीशकडे गेले.
- 1 शमुवेल २७:३सुमारे इ.स.पू. १०५८
दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर गथ येथे राहू लागले. प्रत्येकाबरोबर त्यांचे कुटुंब होते आणि दावीदाच्या दोन पत्नी; येज्रीली अहीनोअम आणि कर्मेली नाबालाची विधवा अबीगईल होत्या.
- 1 शमुवेल २७:४सुमारे इ.स.पू. १०५८
जेव्हा शौलाला कळले की, दावीद गथकडे पळून गेला आहे, त्यानंतर त्याने त्याचा शोध केला नाही.
- 1 शमुवेल २७:५सुमारे इ.स.पू. १०५८
नंतर दावीद आखीश राजास म्हणाला, “जर आपल्या दृष्टीत मी कृपा पावत असलो तर, मला देशातील एका गावात जागा द्या म्हणजे मी तिथे राहीन. आपल्या सेवकाने या राजकीय शहरात तुमच्याबरोबर का राहावे?”
- 1 शमुवेल २७:६सुमारे इ.स.पू. १०५८
म्हणून आखीशने त्या दिवशी त्याला सिकलाग हे शहर दिले. आणि तेव्हापासून ते यहूदीयाच्या राजांचे आहे.
- 1 शमुवेल २७:७सुमारे इ.स.पू. १०५८
दावीद पलिष्ट्यांच्या हद्दीमध्ये एक वर्ष चार महिने राहिला.