मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल २५:२७सुमारे इ.स.पू. १०६०

    आणि ही भेट, जी तुमच्या दासीने माझ्या धन्यासाठी आणली आहे ती तुमच्या बरोबरच्या माणसांना दिली जावो.

  2. 1 शमुवेल २५:२८सुमारे इ.स.पू. १०६०

    “तुमच्या दासीच्या उद्धटपणाची कृपा करून क्षमा करा. याहवेह तुमचा परमेश्वर खचितच माझ्या धन्याचे राजघराणे कायमचे स्थापित करेल, कारण आपण याहवेहतर्फे युद्ध करत आहात आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या ठायी दुष्टता आढळणार नाही.

  3. 1 शमुवेल २५:२९सुमारे इ.स.पू. १०६०

    जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहील, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील.

  4. 1 शमुवेल २५:३०सुमारे इ.स.पू. १०६०

    याहवेहने माझ्या धन्यासाठी जी चांगली अभिवचने दिली आहेत, ती प्रत्येक गोष्ट पूर्णतेस नेऊन आपणास इस्राएलवर अधिकारी म्हणून नेमल्यावर,

  5. 1 शमुवेल २५:३१सुमारे इ.स.पू. १०६०

    माझ्या धन्याने विनाकारण रक्तपात केल्याविषयी किंवा सूड घेतल्याविषयी तुमच्या मनाला टोचणी लागणार नाही किंवा लटपटणारे ओझे असणार नाही. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला यश मिळवून देतील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.”

  6. 1 शमुवेल २५:३२सुमारे इ.स.पू. १०६०

    दावीद अबीगईलला म्हणाला, “ज्यांनी तुला आज माझी भेट घेण्यासाठी पाठवले, ते याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत.

  7. 1 शमुवेल २५:३३सुमारे इ.स.पू. १०६०

    तुझ्या उत्तम निर्णयामुळे व तू मला आज रक्तपातापासून आणि माझ्या हाताने सूड घेण्यापासून दूर ठेवले त्यामुळे तू आशीर्वादित असो.

  8. 1 शमुवेल २५:३४सुमारे इ.स.पू. १०६०

    नाहीतर जिवंत याहवेह इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला तुझा नाश करण्यापासून आवरले त्यांची शपथ, जर तू त्वरा करून माझी भेट घेण्यास आली नसतीस तर पहाटेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता.”

  9. 1 शमुवेल २५:३५सुमारे इ.स.पू. १०६०

    नंतर तिने जे काही त्याच्यासाठी आणले होते ते तिच्या हातून दावीदाने स्वीकारले आणि म्हणाला, “शांतीने घरी जा. मी तुझे म्हणणे ऐकले आहे आणि तुझी विनंती मान्य केली आहे.”

  10. 1 शमुवेल २५:३६सुमारे इ.स.पू. १०६०

    जेव्हा अबीगईल नाबालाकडे गेली तेव्हा तो घरात होता, त्याने एका राजासारखी मेजवानी आयोजित केली होती. आणि मद्यपान करून तो फार नशेत होता, म्हणून सकाळ होईपर्यंत तिने त्याला काहीही सांगितले नाही.

  11. 1 शमुवेल २५:३७सुमारे इ.स.पू. १०६०

    नंतर सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर, त्याच्या पत्नीने त्याला घडलेल्या गोष्टी सांगितल्या, ते सर्व नाबालाला सांगितले. तेव्हा त्याच्या हृदयाला धक्का बसला आणि तो दगडासारखा झाला.

  12. 1 शमुवेल २५:३८सुमारे इ.स.पू. १०६०

    सुमारे दहा दिवसानंतर नाबालाला याहवेहने फटका मारला आणि तो मरण पावला.

  13. 1 शमुवेल २५:३९सुमारे इ.स.पू. १०६०

    जेव्हा दावीदाला कळले की, नाबाल मरण पावला आहे, तेव्हा तो म्हणाला, “ज्यांनी माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्यांनी आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरले आहे त्या याहवेहची स्तुती असो. याहवेहने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर आणली आहे.” नंतर अबीगईलने त्याची पत्नी व्हावे म्हणून दावीदाने तिच्याकडे संदेश पाठवला.

  14. 1 शमुवेल २५:४०सुमारे इ.स.पू. १०६०

    त्याचे सेवक कर्मेल येथे जाऊन अबीगईलला म्हणाले, “दावीदाने आम्हाला तुमच्याकडे पाठविले आहे यासाठी की, तुम्हाला त्यांची पत्नी होण्यास आम्ही घेऊन जावे.”

  15. 1 शमुवेल २५:४१सुमारे इ.स.पू. १०६०

    तिने तिचे मस्तक जमिनीपर्यंत लवून म्हणाली, “मी तुमची दासी आहे. मी तुमची सेवा करण्यास व माझ्या धन्याच्या सेवकांचे पाय धुण्यास तयार आहे.”

  16. 1 शमुवेल २५:४२सुमारे इ.स.पू. १०६०

    अबीगईल त्वरित गाढवावर बसली आणि तिच्या पाच दासी घेऊन दावीदाच्या निरोप्यांबरोबर गेली आणि त्याची पत्नी झाली.

  17. 1 शमुवेल २५:४३सुमारे इ.स.पू. १०६०

    दावीदाने येज्रीलची अहीनोअम हिच्याशीही विवाह केला होता आणि त्या दोघी त्याच्या पत्नी होत्या.

  18. 1 शमुवेल २५:४४सुमारे इ.स.पू. १०६०

    परंतु शौलाने त्याची कन्या मीखल, जी दावीदाची पत्नी होती तिला लईशाचा पुत्र पालती याला दिले होते, जो गल्लीम येथील होता.

  19. 1 शमुवेल २६:१सुमारे इ.स.पू. १०६०

    जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “जेशीमोनच्या समोर असलेल्या हकीलाहच्या डोंगरावर दावीद लपून राहत नाही काय?”

  20. 1 शमुवेल २६:२सुमारे इ.स.पू. १०६०

    तेव्हा शौल त्याच्या निवडलेल्या तीन हजार इस्राएली सैनिकांना बरोबर घेऊन दावीदाचा शोध घेण्यासाठी जीफच्या वाळवंटाकडे निघाला.

  21. 1 शमुवेल २६:३सुमारे इ.स.पू. १०६०

    शौलाने जेशीमोन समोर हकीलाहच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला छावणी घातली आणि दावीद रानातच राहिला. परंतु शौल आपल्यामागे आला आहे हे समजून,

  22. 1 शमुवेल २६:४सुमारे इ.स.पू. १०६०

    दावीदाने आपले दोन सैनिक पाठवून शौल खरोखरच तिथे आला काय याची माहिती काढून घेतली.

  23. 1 शमुवेल २६:५सुमारे इ.स.पू. १०६०

    नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता.

  24. 1 शमुवेल २६:६सुमारे इ.स.पू. १०६०

    तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?” अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.”

  25. 1 शमुवेल २६:७सुमारे इ.स.पू. १०६०

    तेव्हा दावीद आणि अबीशाई रात्रीच्या वेळेस सैन्याकडे गेले आणि शौल तिथे छावणीच्या आतमध्ये झोपलेला होता, त्याच्या उशाशी त्याचा भाला जमिनीमध्ये रोवलेला होता. अबनेर आणि सैनिक त्याच्याभोवती झोपलेले होते.