मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल २३:२८सुमारे इ.स.पू. १०६१

    तेव्हा शौलाने दावीदाचा पाठलाग करण्याचे सोडून दिले आणि तो पलिष्ट्यांशी लढण्यास गेला. याच कारणामुळे या ठिकाणाला सेला-हम्माहलेकोथ असे म्हटले जाते.

  2. 1 शमुवेल २३:२९सुमारे इ.स.पू. १०६१

    नंतर दावीद तिथून पुढे गेला आणि एन-गेदीच्या गडांमध्ये राहिला.

  3. 1 शमुवेल २४:१सुमारे इ.स.पू. १०६१

    पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आल्यानंतर शौलाला सांगण्यात आले, “दावीद एन-गेदीच्या वाळवंटात आहे.”

  4. 1 शमुवेल २४:२सुमारे इ.स.पू. १०६१

    तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्‍यांच्या खडकाळ भागात गेले.

  5. 1 शमुवेल २४:३सुमारे इ.स.पू. १०६१

    रस्त्याने फिरत तो मेंढवाड्याच्या जवळ आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशेस गेला, दावीद आणि त्याची माणसेही त्या गुहेत अगदी लांब आतील बाजूस होती.

  6. 1 शमुवेल २४:४सुमारे इ.स.पू. १०६१

    दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला.

  7. 1 शमुवेल २४:५सुमारे इ.स.पू. १०६१

    त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले.

  8. 1 शमुवेल २४:६सुमारे इ.स.पू. १०६१

    तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.”

  9. 1 शमुवेल २४:७सुमारे इ.स.पू. १०६१

    या शब्दांनी दावीदाने त्याच्या माणसांचा कडकपणे निषेध केला आणि शौलावर हल्ला करण्यास आवरले. तेव्हा शौल गुहेतून बाहेर निघून आपल्या मार्गाने गेला.

  10. 1 शमुवेल २४:८सुमारे इ.स.पू. १०६१

    नंतर दावीद गुहेच्या बाहेर आला आणि शौलाला हाक मारली, “महाराज, माझ्या धन्या!” जेव्हा शौलाने मागे पाहिले, तेव्हा दावीदाने भूमीकडे आपले तोंड करून दंडवत घातले.

  11. 1 शमुवेल २४:९सुमारे इ.स.पू. १०६१

    तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’?

  12. 1 शमुवेल २४:१०सुमारे इ.स.पू. १०६१

    आज तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, कशाप्रकारे याहवेहने गुहेमध्ये तुम्हाला माझ्या हाती दिले होते. तुम्हाला मारून टाकावे असे काहीजण म्हणाले, परंतु मी तुम्हाला सोडले; मी म्हणालो, ‘मी माझ्या धन्यावर हात टाकणार नाही, कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.’

  13. 1 शमुवेल २४:११सुमारे इ.स.पू. १०६१

    पाहा, माझ्या पित्या, तुमच्या झग्याचा तुकडा माझ्या हातात आहे तो पाहा! मी तुमच्या झग्याचा काठ कापून घेतला परंतु तुम्हाला मारून टाकले नाही. यावरून माझ्याकडे दुष्ट किंवा फितुरी असल्याचा दोष नाही. मी तुमच्याशी चुकीचे वागलो नाही, तरीही तुम्ही माझ्या जिवाची शिकार करण्यास टपला आहात.

  14. 1 शमुवेल २४:१२सुमारे इ.स.पू. १०६१

    याहवेह तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करो. तुम्ही माझ्याबरोबर जे चुकीचे केले आहे त्याचा बदला याहवेहच घेवो, परंतु मी तुम्हाला हात लावणार नाही.

  15. 1 शमुवेल २४:१३सुमारे इ.स.पू. १०६१

    जशी प्राचीन काळाची म्हण ‘दुष्टापासून दुष्टाई येते,’ म्हणून माझा हात तुम्हाला स्पर्श करणार नाही.

  16. 1 शमुवेल २४:१४सुमारे इ.स.पू. १०६१

    “इस्राएलचा राजा कोणाविरुद्ध बाहेर आला आहे? तुम्ही कोणाचा पाठलाग करीत आहात? एका मेलेल्या कुत्र्याचा? एखाद्या पिसवाचा?

  17. 1 शमुवेल २४:१५सुमारे इ.स.पू. १०६१

    याहवेहनेच आपला न्यायाधीश होऊन आपल्यामध्ये निवाडा करावा. त्यांनी माझा वाद लक्षात घेऊन माझा कैवार घ्यावा; व मला तुमच्या हातून सोडवून माझी सुटका करावी.”

  18. 1 शमुवेल २४:१६सुमारे इ.स.पू. १०६१

    जेव्हा दावीदाने त्याचे हे बोलणे संपविले तेव्हा शौलाने विचारले, “दावीदा, माझ्या पुत्रा, हा तुझाच आवाज आहे काय?” आणि शौल मोठ्याने रडला,

  19. 1 शमुवेल २४:१७सुमारे इ.स.पू. १०६१

    तो दावीदाला म्हणाला, “तू माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहेस, तू माझ्याशी सदाचाराने वागलास, परंतु मी तुझ्याशी वाईट वागलो.

  20. 1 शमुवेल २४:१८सुमारे इ.स.पू. १०६१

    तू माझ्याशी चांगले वागतोस ते तू आताच मला दाखवून दिले आहेस; याहवेहने मला तुझ्या हाती दिले होते, परंतु तू मला मारून टाकले नाहीस.

  21. 1 शमुवेल २४:१९सुमारे इ.स.पू. १०६१

    कोणा मनुष्याला त्याचा शत्रू सापडला तेव्हा त्याला इजा केल्याशिवाय जाऊ देईल काय? ज्याप्रकारे तू आज माझ्याशी वागलास त्याचे चांगले प्रतिफळ याहवेह तुला देवो.

  22. 1 शमुवेल २४:२०सुमारे इ.स.पू. १०६१

    मला माहीत आहे की, तू खरोखर राजा होशील आणि इस्राएलचे राज्य तुझ्या हातात स्थापित होईल.

  23. 1 शमुवेल २४:२१सुमारे इ.स.पू. १०६१

    तेव्हा आता मला याहवेहची शपथ घेऊन सांग की, माझ्या वंशजांचा तू नाश करणार नाहीस किंवा माझ्या पित्याच्या घराण्यातून माझे नाव पुसून टाकणार नाहीस.”

  24. 1 शमुवेल २४:२२सुमारे इ.स.पू. १०६१

    तेव्हा दावीदाने शौलास शपथेने वचन दिले; नंतर शौल घरी गेला, परंतु दावीद आणि त्याची माणसे गडाकडे गेली.

  25. 1 शमुवेल २५:१सुमारे इ.स.पू. १०६०

    शमुवेल मरण पावला, तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्याच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्याला रामाह येथील त्याच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या वाळवंटात गेला.