Skip to content

Jesse बद्दल बायबलमधील वचने

43 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह शमुवेलला म्हणाले, “मी शौलाला इस्राएलाचा राजा म्हणून नाकारले आहे, तर तू कुठवर त्याच्यासाठी शोक करीत राहणार? तुझे शिंग तेलाने भर आणि चल; मी तुला बेथलेहेमकर इशाय याच्याकडे पाठवित आहे. मी त्याच्या एका पुत्राला राजा म्हणून निवडले आहे.”

  2. परंतु शमुवेल म्हणाला, “मी कसे जाऊ? जर शौलाने याविषयी ऐकले, तर तो मला जिवे मारेल.” याहवेह म्हणाले, “तुझ्यासोबत एक कालवड घे आणि सांग, ‘मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे.’

  3. इशायला यज्ञासाठी आमंत्रित कर आणि तू काय करावे ते मी तुला दाखवेन. ज्याला मी सूचित करेन त्याला तू माझ्यासाठी अभिषिक्त कर.”

  4. याहवेहने सांगितल्याप्रमाणे शमुवेलने केले. जेव्हा शमुवेल बेथलेहेमला पोहोचला, तेव्हा त्या नगराचे वडीलजन थरथर कापत त्याला भेटले. त्यांनी विचारले, “आपण शांतीने आला आहात काय?”

  5. शमुवेलने उत्तर दिले, “होय, मी शांतीने आलो आहे; मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे. आपणास शुद्ध करा आणि माझ्याबरोबर यज्ञाला या.” मग शमुवेलने इशाय व त्याच्या पुत्रांना शुद्ध केले आणि त्यांना यज्ञासाठी आमंत्रण दिले.

  6. ते आल्यानंतर एलियाबाला पाहून शमुवेलला वाटले, “निश्चितच याहवेहचा अभिषिक्त येथे याहवेहसमोर उभा आहे.”

  7. परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, “त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात.”

  8. नंतर इशायाने अबीनादाबाला शमुवेलसमोर चालविले. परंतु शमुवेलने म्हटले, “याहवेहने यालाही निवडले नाही.”

  9. नंतर इशायाने शम्माहला चालविले, परंतु शमुवेल म्हणाला, “हा सुद्धा याहवेहने निवडलेला नाही.”

  10. इशायाने त्याचे सात पुत्र शमुवेलसमोर चालविले, परंतु शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने यांना निवडले नाही.”

  11. तेव्हा त्यांनी इशायला विचारले, “तुझे पुत्र येण्याचे पूर्ण झाले काय?” इशायाने उत्तर दिले, “अजून एक जो सर्वात लहान आहे, तो रानात मेंढरे राखीत आहे.” शमुवेल म्हणाले, “त्याला बोलाविणे पाठव; कारण तो येईपर्यंत आम्ही बसणार नाही.”

  12. तेव्हा इशायाने त्याला बोलावून आणले. तो तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला देखणा होता. तेव्हा याहवेह म्हणाले, “ऊठ आणि त्याला अभिषिक्त कर, हाच तो आहे.”

  13. तेव्हा शमुवेलने तेलाचे शिंग घेतले व त्याच्या भावांदेखत दावीदाचा अभिषेक केला आणि त्या दिवसापासून याहवेहचा आत्मा सामर्थ्याने दावीदावर आला. नंतर शमुवेल रामाह येथे परत गेला.

  14. तेव्हा शौलाने इशायाकडे निरोप पाठवून म्हटले, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत आहे त्याला माझ्याकडे पाठव.”

  15. तेव्हा इशायाने आपला पुत्र दावीदाबरोबर भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू लादलेले एक गाढव शौलाकडे पाठविले.

  16. दावीद शौलाकडे आला व त्याच्या सेवेस हजर झाला. शौलाला तो अतिशय आवडला व दावीद त्याचा एक शस्त्रवाहक झाला.

  17. नंतर शौलाने इशायला संदेश पाठवून सांगितले, “दावीदाला माझ्या सेवेत असू दे. कारण मी त्याच्यावर प्रसन्न आहे.”

  18. ज्या ज्यावेळी परमेश्वराकडून पाठविलेला दुष्ट आत्मा शौलावर येई, त्यावेळी दावीद आपली वीणा घेऊन वाजवित असे, तेव्हा शौलाला बरे वाटत असे, आणि दुष्ट आत्मा शौलाला सोडून जात असे.

  19. इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते.

  20. दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले,

  21. परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे.

  22. तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे.

  23. एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा.

  24. त्याचबरोबर खव्याचे हे दहा लाडू त्यांच्या तुकडीच्या सेनापतीसाठी घे, तुझे भाऊ कसे आहेत ते पाहा आणि परत येताना त्यांच्याकडून काही शांतीची बातमी घेऊन ये.

  25. ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्‍यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”