मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 करिंथकरांस ११:१७सुमारे इ.स. ६०

    जसे प्रभू बोलतात तसा मी बोलत नाही, परंतु माझ्या स्वविश्वासाच्या प्रौढीमध्ये मूर्खपणाने बोलतो.

  2. 2 करिंथकरांस ११:१८सुमारे इ.स. ६०

    देहाला अनुसरून अनेक लोक प्रौढी मिरवितात, मग मी सुद्धा प्रौढी मिरवीन.

  3. 2 करिंथकरांस ११:१९सुमारे इ.स. ६०

    तुम्ही फार शहाणे आहात म्हणून तुम्ही मूर्खांचे आनंदाने सहन करून घेता.

  4. 2 करिंथकरांस ११:२०सुमारे इ.स. ६०

    खरे पाहता, जे तुम्हाला गुलाम बनवितात किंवा तुमचे हिरावून घेतात किंवा गैरफायदा घेतात, स्वतःस उच्च करतात किंवा तुमच्या तोंडात चापट मारतात, तरी तुम्ही या गोष्टी सहन करून घेता.

  5. 2 करिंथकरांस ११:२१सुमारे इ.स. ६०

    मला सांगावयास लाज वाटते की याबाबतीत आम्ही दुर्बल आहोत! जर कशाबद्दल कोणी गर्व करण्याचे धैर्य करीत असेल तर मला देखील गर्व करण्याचे धैर्य होईल. हे मी पुन्हा मूर्खासारखा बोलत आहे.

  6. 2 करिंथकरांस ११:२२सुमारे इ.स. ६०

    ते इब्री आहेत का? तर मी पण आहे. ते इस्राएली आहेत का? मग मी देखील आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत ना? मग, मी देखील आहे.

  7. 2 करिंथकरांस ११:२३सुमारे इ.स. ६०

    ते ख्रिस्ताचे सेवक आहेत ना? मी अधिक आहे. असे मी वेड्यासारखे बोलतो! अधिक श्रम केले आहे, वारंवार तुरुंगात पडलो आहे, तीव्र फटके खाल्ले आणि अनेक वेळा मृत्यूला तोंड दिले.

  8. 2 करिंथकरांस ११:२४सुमारे इ.स. ६०

    यहूद्यांनी पाच वेळेला एक कमी चाळीस फटक्यांची मला शिक्षा दिली.

  9. 2 करिंथकरांस ११:२५सुमारे इ.स. ६०

    तीन वेळा मला छड्यांनी मारण्यात आले. एकदा मला धोंडमार झाला. तीन वेळा माझे तारू फुटले, एक रात्र आणि एक दिवस मी समुद्रात घालविला.

  10. 2 करिंथकरांस ११:२६सुमारे इ.स. ६०

    मी सतत प्रवास केले आहेत आणि नद्यांची संकटे, लुटारूंची संकटे, यहूदी लोकांची संकटे, गैरयहूदी लोकांची संकटे, शहरातील संकटे, गावातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या विश्वासणार्‍यांपासून संकटे.

  11. 2 करिंथकरांस ११:२७सुमारे इ.स. ६०

    मी श्रम व कष्ट केले आणि अनेकदा झोपेशिवाय राहिलो आहे. अनेक वेळा मी उपाशी व तान्हेला होतो; पुष्कळदा भोजनाशिवाय राहिलो आहे; मी थंडीने कुडकुडलो व नग्न होतो.

  12. 2 करिंथकरांस ११:२८सुमारे इ.स. ६०

    मग याव्यतिरिक्त, दररोज सर्व मंडळ्यांच्या चिंतेचे ओझे माझ्यावर आहे.

  13. 2 करिंथकरांस ११:२९सुमारे इ.स. ६०

    जर कोणी अशक्त आहे, तर मला अशक्तपणा जाणवत नाही का? कोणी पापात अडखळविला गेला, तर त्याचे मला दुःख होणार नाही काय?

  14. 2 करिंथकरांस ११:३०सुमारे इ.स. ६०

    जर मला अभिमान मिरवायचा असेल, तर ज्या गोष्टींमध्ये माझा दुबळेपणा दिसून येतो त्यांचा मी अभिमान मिरवीन.

  15. 2 करिंथकरांस ११:३१सुमारे इ.स. ६०

    परमेश्वर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता, ज्यांची युगानुयुग स्तुती असो, त्यांना ठाऊक आहे की मी लबाडी करीत नाही.

  16. 2 करिंथकरांस ११:३२सुमारे इ.स. ६०

    उदाहरणार्थ, दिमिष्क शहरात अरीतास राजाच्या राज्यपालाने मला पकडण्यासाठी वेशींमध्ये पहारे बसविले होते;

  17. 2 करिंथकरांस ११:३३सुमारे इ.स. ६०

    परंतु मला एका टोपलीत बसविले ती टोपली शहराच्या भिंतीच्या एका झरोक्यातून खाली सोडण्यात आली आणि अशा रीतीने मी तिथून निसटलो.

  18. 2 करिंथकरांस १२:१सुमारे इ.स. ६०

    मी प्रौढी मिरवित जाणारच. यामुळे काही निष्पन्न होणार नाही, तरी प्रभूपासून मला जे दृष्टान्त आणि प्रकटीकरणे झाली; त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगत जातो.

  19. 2 करिंथकरांस १२:२सुमारे इ.स. ६०

    मला एक मनुष्य ख्रिस्तामध्ये माहीत आहे, त्याला चौदा वर्षांपूर्वी तिसर्‍या स्वर्गात वर उचलून नेण्यात आले होते. तो शरीराने किंवा शरीराविरहित मला ते माहीत नाही; परमेश्वराला माहीत आहे.

  20. 2 करिंथकरांस १२:३सुमारे इ.स. ६०

    आणि मला माहीत आहे की हा मनुष्य शरीराने किंवा शरीराविरहित हे मला माहीत नाही, परमेश्वराला माहीत आहे,

  21. 2 करिंथकरांस १२:४सुमारे इ.स. ६०

    स्वर्गामध्ये घेतला गेला, आणि ज्या गोष्टींचे वर्णन करून सांगता येणार नाही अशा गोष्टी ऐकल्या. त्या गोष्टी दुसर्‍यांना सांगण्याची परवानगी नाही.

  22. 2 करिंथकरांस १२:५सुमारे इ.स. ६०

    मी अशा मनुष्याबद्दल प्रौढी मिरवीन, मी स्वतःबद्दल तर नाही, परंतु फक्त माझ्या दुबळेपणाची प्रौढी मिरवीन.

  23. 2 करिंथकरांस १२:६सुमारे इ.स. ६०

    मी प्रौढी मिरवावी असे ठरविले तर तसे केल्याने मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी सत्य बोलत आहे, परंतु मी तसे करणार नाही. कारण मी करतो व बोलतो त्यापेक्षा कोणीही मला जास्त मानू नये, अशी माझी इच्छा आहे.

  24. 2 करिंथकरांस १२:७सुमारे इ.स. ६०

    मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला.

  25. 2 करिंथकरांस १२:८सुमारे इ.स. ६०

    मी प्रभूला तीन वेळा हे माझ्यापासून काढून घ्यावे म्हणून विनंती केली.