मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 करिंथकरांस १२:९सुमारे इ.स. ६०

    त्यांनी म्हटले, “माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील.

  2. 2 करिंथकरांस १२:१०सुमारे इ.स. ६०

    ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान व कष्ट, छळ व अडचणी, याविषयी मी अगदी संतुष्ट आहे; कारण जेव्हा मी अशक्त आहे, तेव्हाच मी सबळ असतो.

  3. 2 करिंथकरांस १२:११सुमारे इ.स. ६०

    अशा रीतीने प्रौढी मिरवायला लावून, मी स्वतःला मूर्ख बनविले आहे आणि तुम्ही मला तसे वागायला भाग पाडले आहे. खरेतर तुम्ही माझी प्रशंसा करावयास पाहिजे होती, जरी मी तुच्छ असलो तरी त्या “उच्च प्रेषितांच्या” तुलनेत मी कमी नाही.

  4. 2 करिंथकरांस १२:१२सुमारे इ.स. ६०

    मी तुमच्याबरोबर राहत असताना मी निश्चित प्रेषित आहे, याचा पुरावा धीराने तुमच्यामध्ये अनेक चमत्कार, चिन्हे आणि महत्कृत्ये केली यामधून दिसून येते.

  5. 2 करिंथकरांस १२:१३सुमारे इ.स. ६०

    मी माझे ओझे तुमच्यावर टाकले नाही तर इतर मंडळ्यांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीत तुम्ही कमी भरला? या चुकीबद्दल तुम्ही मला कृपा करून क्षमा करा!

  6. 2 करिंथकरांस १२:१४सुमारे इ.स. ६०

    आता मी तिसर्‍यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे.

  7. 2 करिंथकरांस १२:१५सुमारे इ.स. ६०

    मी तुम्हासाठी जे काही आहे ते आनंदाने सर्व खर्च करण्यासाठी तयार आहे आणि मला स्वतःसही खर्च करण्यास तयार आहे. जर मी तुमच्यावर अधिक प्रीती करतो, तर तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता का?

  8. 2 करिंथकरांस १२:१६सुमारे इ.स. ६०

    काही असो, मी तुमच्यावर ओझे झालो नाही. तरीही, मी धूर्त आहे आणि मी आपल्याला फसविले असे तुम्हाला वाटते का?

  9. 2 करिंथकरांस १२:१७सुमारे इ.स. ६०

    ज्या लोकांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्याद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला का?

  10. 2 करिंथकरांस १२:१८सुमारे इ.स. ६०

    तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?

  11. 2 करिंथकरांस १२:१९सुमारे इ.स. ६०

    आम्ही स्वतःच्या बचावासाठी हे करतो असे तुम्हाला वाटते का? आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्याशी बोलत आहोत. प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुमच्या वृद्धीसाठी आहे.

  12. 2 करिंथकरांस १२:२०सुमारे इ.स. ६०

    कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल.

  13. 2 करिंथकरांस १२:२१सुमारे इ.स. ६०

    होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल.

  14. 2 करिंथकरांस १३:१सुमारे इ.स. ६०

    तुमच्या भेटीला येण्याची ही माझी तिसरी वेळ राहील. “प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.”

  15. 2 करिंथकरांस १३:२सुमारे इ.स. ६०

    मी तुमच्याबरोबर दुसर्‍या खेपेला तिथे असताना आधी इशारा दिलाच आहे. आणि आता मी अनुपस्थित असतानाही सांगतो: मी परत आलो तर ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्या सर्वांची गय करणार नाही

  16. 2 करिंथकरांस १३:३सुमारे इ.स. ६०

    ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतात या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. ते तुम्हाविषयी अशक्त नाही, तर ते तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी अशक्त नाही तर सामर्थी असे आहेत.

  17. 2 करिंथकरांस १३:४सुमारे इ.स. ६०

    त्यांना अशक्तपणात क्रूसावर खिळले गेले, तरी परमेश्वराच्या शक्तीने ते जिवंत आहेत. त्यासारखेच आम्ही त्यांच्यामध्ये अशक्त आहोत, तरी परमेश्वराच्या शक्तीने तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी जिवंत आहोत.

  18. 2 करिंथकरांस १३:५सुमारे इ.स. ६०

    तुम्हीच स्वतःचे परीक्षण करा. तुम्ही निश्चित विश्वासात आहात की नाही; तुमची परीक्षा करून पाहा. ख्रिस्त येशू तुम्हामध्ये आहे हे तुम्हाला कळत नाही तर कदाचित तुम्ही परीक्षेत उतरला नाहीत?

  19. 2 करिंथकरांस १३:६सुमारे इ.स. ६०

    या कसोटीत आम्ही अयशस्वी झालो नाही हे तुम्हाला आढळून येईल, असा विश्वास धरतो.

  20. 2 करिंथकरांस १३:७सुमारे इ.स. ६०

    आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही जे अयोग्य आहे ते करू नये केवळ आम्ही परीक्षेत उतरलो आहोत म्हणून नव्हे आणि जरी आम्ही उतरलो नाही असे दिसले तरी तुम्ही योग्य जे आहे ते करावे.

  21. 2 करिंथकरांस १३:८सुमारे इ.स. ६०

    आपण सत्याविरूद्ध काही करू शकत नाही, परंतु सत्यासाठीच करू शकतो.

  22. 2 करिंथकरांस १३:९सुमारे इ.स. ६०

    तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे.

  23. 2 करिंथकरांस १३:१०सुमारे इ.स. ६०

    मी या गोष्टी माझ्या अनुपस्थित लिहितो ते या आशेने की, तिथे आल्यावर जो अधिकार प्रभूने मला दिला त्याचा कठीण रीतीने वापर करून तुम्हाला पाडण्यासाठी नव्हे तर तुमची वृद्धी करण्यासाठी करू.

  24. 2 करिंथकरांस १३:११सुमारे इ.स. ६०

    शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.

  25. 2 करिंथकरांस १३:१२सुमारे इ.स. ६०

    एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा.