मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 करिंथकरांस १०:१०सुमारे इ.स. ६०

    काहीजण म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व प्रभावी आहेत परंतु व्यक्ती म्हणून त्याचा प्रभाव पडत नाही आणि त्याच्या भाषणात काही तथ्य नाही.”

  2. 2 करिंथकरांस १०:११सुमारे इ.स. ६०

    अशा लोकांना हे समजावे की आम्ही अनुपस्थितीत असताना आमच्या पत्राद्वारे जे काही आम्ही आहोत, तेच उपस्थित असताना आमच्या कृतीद्वारे आहोत.

  3. 2 करिंथकरांस १०:१२सुमारे इ.स. ६०

    जे स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याशी तुलना करण्याचे धैर्य आम्ही करीत नाही. ते स्वतःचे आपसात मोजमाप करतात व आपसातच तुलना करतात, ते शहाणे नाहीत.

  4. 2 करिंथकरांस १०:१३सुमारे इ.स. ६०

    आम्ही मर्यादेच्या बाहेर प्रौढी मिरविणार नाही, तर जी सेवा परमेश्वराने आम्हास नेमून दिली आहे व जी मर्यादा परमेश्वराने आम्हास लावून दिली आहे, त्या मर्यादेतच आम्ही प्रौढी मिरवू आणि त्यात तुमचाही समावेश आहे.

  5. 2 करिंथकरांस १०:१४सुमारे इ.स. ६०

    ख्रिस्ताविषयीची शुभवार्ता तुमच्याकडे पोहोचविणारे आम्हीच पहिले होतो. म्हणून अधिक प्रौढी मिरवून मर्यादेचे उल्लंघन करीत नाही, जर आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नसतो तर आम्ही मर्यादेचे उल्लंघन करीत आहोत हे बोलणे ठीक असते.

  6. 2 करिंथकरांस १०:१५सुमारे इ.स. ६०

    जे कार्य दुसर्‍यांनी केले आहे त्याबद्दल आम्ही मर्यादा सोडून अभिमान बाळगत नाही. तुमचा विश्वास जसजसा वाढत जाईल तसेच आमच्या कार्याचे क्षेत्र तुम्हामध्ये खूप वाढावे, अशी आमची आशा आहे.

  7. 2 करिंथकरांस १०:१६सुमारे इ.स. ६०

    त्यानंतर तुमच्यापलीकडे, दूरवर असलेल्या प्रांतात आम्हाला शुभवार्ता गाजविता येईल आणि इतर लोकांच्या क्षेत्रात जे काम आधी केले आहे त्याबद्दल अभिमान बाळगण्याचे आम्हास कारण उरणार नाही.

  8. 2 करिंथकरांस १०:१७सुमारे इ.स. ६०

    “जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.”

  9. 2 करिंथकरांस १०:१८सुमारे इ.स. ६०

    कोणी स्वतःची प्रशंसा करतो तर त्यास मान्यता मिळेल असे नाही, परंतु ज्याची प्रशंसा प्रभू करतात त्यास मान्यता मिळेल.

  10. 2 करिंथकरांस ११:१सुमारे इ.स. ६०

    माझी आशा आहे की तुम्ही माझा थोडा मूर्खपणा सहन करून घ्याल. हो, कृपा करून सहन करून घ्या.

  11. 2 करिंथकरांस ११:२सुमारे इ.स. ६०

    तुम्हासाठी माझी जी आस्था आहे ती दैवी आस्था आहे. मी तुम्हाला एक पती, ख्रिस्त त्यांचे वचन दिले होते, म्हणजे मी तुम्हाला एक शुद्ध कुमारी म्हणून त्यांना सादर करावे.

  12. 2 करिंथकरांस ११:३सुमारे इ.स. ६०

    परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.

  13. 2 करिंथकरांस ११:४सुमारे इ.स. ६०

    जर कोणी तुम्हाकडे येऊन आम्ही प्रचार करतो त्या येशूंऐवजी दुसर्‍या येशूंचा प्रचार करतो किंवा तुम्ही जो आत्मा स्वीकारला होता त्याऐवजी दुसरा आत्मा स्वीकारला, किंवा जी शुभवार्ता तुम्ही स्वीकारली त्या शुभवार्तेहून भिन्न अशी शुभवार्ता तुम्ही स्वीकारली, तर तुम्ही हे सहजपणे स्वीकारता व सहन करून घेता.

  14. 2 करिंथकरांस ११:५सुमारे इ.स. ६०

    जे “उच्च संदेष्टे” आहेत त्यांच्यापेक्षा मी कमी प्रतीचा आहे असे मी समजत नाही.

  15. 2 करिंथकरांस ११:६सुमारे इ.स. ६०

    मी अशिक्षित वक्ता असेन, परंतु मला ज्ञान आहे आणि ते आम्ही अनेक प्रकारे पटवून दिले आहे.

  16. 2 करिंथकरांस ११:७सुमारे इ.स. ६०

    परमेश्वराच्या शुभवार्तेचा संदेश तुम्हाला फुकट सांगितला व यात मी स्वतःला हीन केले व तुम्हाला उच्च केले तर यात मी पाप केले काय?

  17. 2 करिंथकरांस ११:८सुमारे इ.स. ६०

    इतर मंडळ्यांचे वेतन घेऊन मी जणू काय त्यांनाच लुबाडले यासाठी की मला तुमची सेवा करता यावी.

  18. 2 करिंथकरांस ११:९सुमारे इ.स. ६०

    आणि मी जेव्हा तुमच्याजवळ होतो आणि मला गरज पडली, मी कोणालाही ओझे झालो नाही, कारण मासेदोनियातून जे बंधू आले त्यांनी माझ्या गरजांची परिपूर्ती केली व माझे ओझे कोणत्याही प्रकारे तुम्हावर पडणार नाही आणि मी असेच पुढेही करेन.

  19. 2 करिंथकरांस ११:१०सुमारे इ.स. ६०

    जोपर्यंत ख्रिस्ताचे सत्य मजमध्ये आहे, तोपर्यंत अखया प्रांतातील कोणीही मी करीत असलेल्या अभिमानास प्रतिबंध करू शकणार नाही

  20. 2 करिंथकरांस ११:११सुमारे इ.स. ६०

    का? कारण मी तुमच्यावर प्रीती करीत नाही? मी प्रीती करतो हे परमेश्वराला माहीत आहे!

  21. 2 करिंथकरांस ११:१२सुमारे इ.स. ६०

    मी जे करतो ते करीत राहीन, यासाठी की जे आम्ही त्यांच्या समान आहोत असे मानतात व त्याबाबत प्रौढी मिरविण्याची संधी शोधतात त्यांना ती मिळू नये.

  22. 2 करिंथकरांस ११:१३सुमारे इ.स. ६०

    कारण असे लोक खोटे प्रेषित, फसविणारे कामकरी, ख्रिस्ताचे प्रेषित आहोत असा समज करून फसविणारे आहेत.

  23. 2 करिंथकरांस ११:१४सुमारे इ.स. ६०

    यात आश्चर्य वाटत नाही! कारण स्वतः सैतानही प्रकाशाचा दूत असे रूप धारण करतो.

  24. 2 करिंथकरांस ११:१५सुमारे इ.स. ६०

    मग त्याचे सेवकही नीतिमान असल्याचे ढोंग करतात यात काही नवल नाही. त्यांच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा शेवट होईल.

  25. 2 करिंथकरांस ११:१६सुमारे इ.स. ६०

    पुन्हा मी तुम्हाला सांगतो: मला मूर्ख समजू नका; आणि तसे तुम्ही मला समजत असाल तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा, यासाठी की मला थोडा गर्व करण्याचा प्रसंग मिळेल.