- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 2 करिंथकरांस ८:२४सुमारे इ.स. ६०
कृपा करून ती प्रीती या बंधुंवरही करा आणि तुम्ही ते सर्व त्यांच्यासाठी कराल असे मी अभिमानाने व जाहीरपणे म्हटले आहे. ते सर्व मंडळ्यांनी पाहावे.
- 2 करिंथकरांस ९:१सुमारे इ.स. ६०
प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही.
- 2 करिंथकरांस ९:२सुमारे इ.स. ६०
कारण अशी मदत करण्याविषयीची तुमची उत्सुकता मला चांगली माहीत आहे; आणि तुमची अखया येथून गेल्या वर्षापूर्वीच अशी देणगी पाठविण्याची तयारी होती, असे मी मासेदोनियांना मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. खरे म्हणजे तुमचा हा उत्साह पाहूनच येथील अनेकांना मदत करावी अशी प्रेरणा झाली.
- 2 करिंथकरांस ९:३सुमारे इ.स. ६०
या गोष्टीबाबतीत तुमच्याबद्दलचा माझा अभिमान व्यर्थ ठरू नये म्हणून मी या भावांना पाठवित आहे, यासाठी की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार असावे.
- 2 करिंथकरांस ९:४सुमारे इ.स. ६०
मासेदोनियातील काही लोक माझ्याबरोबर आले आणि मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तुमची काहीच तयारी नाही असे आढळले, तर आम्हास तुमच्याबद्दल जो भरवसा होता त्याबद्दल काही म्हणता येणार नाही व ते लाजिरवाणे ठरेल.
- 2 करिंथकरांस ९:५सुमारे इ.स. ६०
म्हणून मला असे वाटले, हे आवश्यक आहे की, बंधूंना अशी विनंती करावी की त्यांनी प्रथम तुमची भेट घ्यावी आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार उदारतेने देत असलेल्या देणगीची व्यवस्था पूर्ण करावी. तेव्हा ती एक मुक्तहस्ताने दिलेली भेट अशी असेल, असंतुष्टतेने देणार्यासारखी ती नसेल.
- 2 करिंथकरांस ९:६सुमारे इ.स. ६०
परंतु हे लक्षात ठेवा जो कोणी राखून पेरतो, तर तो राखूनच कापणी करेल. जो उदारपणे बी पेरतो, तो उदारपणे कापणी करेल.
- 2 करिंथकरांस ९:७सुमारे इ.स. ६०
आपण किती द्यावे हे ज्याने त्याने स्वतः मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, हे भाग पाडते म्हणून किंवा बळजबरीने नव्हे, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो.
- 2 करिंथकरांस ९:८सुमारे इ.स. ६०
परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. ते तुम्हाला सर्ववेळी व सर्व गोष्टीत एवढे देतील की जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते मिळेल व चांगल्या कामासाठी भरपूर शिल्लक राहील.
- 2 करिंथकरांस ९:९सुमारे इ.स. ६०
हे शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे आहे: “गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात; त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते.”
- 2 करिंथकरांस ९:१०सुमारे इ.स. ६०
कारण तो पेरणार्यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल.
- 2 करिंथकरांस ९:११सुमारे इ.स. ६०
होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे.
- 2 करिंथकरांस ९:१२सुमारे इ.स. ६०
म्हणजे तुमच्या या सेवेमुळे केवळ प्रभूंच्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यास साहाय्य होते असे नाही तर परमेश्वराप्रती उपकारस्तुती ओसंडून वाहू लागते.
- 2 करिंथकरांस ९:१३सुमारे इ.स. ६०
तुम्ही करीत असलेले सेवाकार्य यामुळे तुम्ही सिद्ध करून दाखविले आहे की, तुम्ही ख्रिस्ताच्या शुभवार्तेला कबूल करून आज्ञाधारक राहिला, तसेच तुम्ही त्यांच्या व सर्वांच्याप्रती उदारता दाखविली म्हणून इतरजण परमेश्वराची स्तुती करतील,
- 2 करिंथकरांस ९:१४सुमारे इ.स. ६०
आणि परमेश्वराची अद्भुत कृपा तुमच्यावर प्रकट झाली म्हणून त्यांची मने तुम्हाकडे लागली आहेत व ते तुमच्यासाठी उत्कंठेने प्रार्थना करतात.
- 2 करिंथकरांस ९:१५सुमारे इ.स. ६०
परमेश्वराच्या अवर्णनीय देणगीबद्दल त्यांची स्तुती असो.
- 2 करिंथकरांस १०:१सुमारे इ.स. ६०
ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो.
- 2 करिंथकरांस १०:२सुमारे इ.स. ६०
मी तुम्हाला विनंती करतो की मी तिथे आलो की ज्याकाही लोकांना वाटते की आमची जीवनशैली ऐहिक आहे, त्यांच्याविरुद्ध कठोर होण्याची गरज भासणार नाही, अशी माझी आशा आहे.
- 2 करिंथकरांस १०:३सुमारे इ.स. ६०
आम्ही या जगामध्ये राहतो तरीपण ऐहिक लोक जसे युद्ध करतात तसे आम्ही करीत नाही.
- 2 करिंथकरांस १०:४सुमारे इ.स. ६०
जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे.
- 2 करिंथकरांस १०:५सुमारे इ.स. ६०
आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो.
- 2 करिंथकरांस १०:६सुमारे इ.स. ६०
तुमचे आज्ञापालन पूर्ण झाल्यावर, जे आज्ञा न पाळणारे आहेत आम्ही त्यांना दंड करण्यास तयार आहोत.
- 2 करिंथकरांस १०:७सुमारे इ.स. ६०
तुम्ही बाहेरील रूप पाहून न्याय करता. जर कोणाला असा भरवसा असेल की ते ख्रिस्ताचे आहेत, तर त्यांनी याबद्दल पुन्हा विचार करावा की जसे आम्ही ख्रिस्ताचे आहोत तसे तेही आहेत.
- 2 करिंथकरांस १०:८सुमारे इ.स. ६०
हा अधिकार प्रभूने तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला विकसित करण्यासाठी आम्हाला दिला आहे, आणि जरी मी त्याविषयी थोडाफार अभिमान दाखविला, तरी मला त्याची लाज वाटणार नाही.
- 2 करिंथकरांस १०:९सुमारे इ.स. ६०
तुम्हाला असा भास होऊ नये की घाबरून सोडण्याच्या उद्देशाने मी पत्रे लिहित आहे.