circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 2 करिंथकरांस ६:८सुमारे इ.स. ६०
गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले;
- 2 करिंथकरांस ६:९सुमारे इ.स. ६०
प्रसिद्ध तरी अप्रसिद्ध, मृत्यूच्या समीप परंतु जिवंत; घायाळ केलेले परंतु मृत्यूपासून राखलेले
- 2 करिंथकरांस ६:१०सुमारे इ.स. ६०
व्यथित परंतु सतत आनंदित; गरीब परंतु इतरांना धनवान बनविणारे; मालकीचे काहीही नाही आणि तरी सर्वकाही असल्यासारखे असे आहोत.
- 2 करिंथकरांस ६:११सुमारे इ.स. ६०
करिंथकरांनो आम्ही तुमच्यापासून काहीच न लपविता आमचे हृदय तुमच्यासमोर मोकळे केले आहे.
- 2 करिंथकरांस ६:१२सुमारे इ.स. ६०
आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे.
- 2 करिंथकरांस ६:१३सुमारे इ.स. ६०
तुम्ही माझी स्वतःची मुले आहात असे समजून मी बोलत आहे. तुमची अंतःकरणेसुद्धा संपूर्णपणे उघडी करा.
- 2 करिंथकरांस ६:१४सुमारे इ.स. ६०
विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यामध्ये काही भागीदारी आहे काय?
- 2 करिंथकरांस ६:१५सुमारे इ.स. ६०
तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासणारा मनुष्य व विश्वासहीन मनुष्य यांच्यामध्ये साम्य आहे का?
- 2 करिंथकरांस ६:१६सुमारे इ.स. ६०
आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”
- 2 करिंथकरांस ६:१७सुमारे इ.स. ६०
यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”
- 2 करिंथकरांस ६:१८सुमारे इ.स. ६०
आणि “मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतात.”
- 2 करिंथकरांस ७:१सुमारे इ.स. ६०
यास्तव, आपल्याला अशी अभिवचने मिळाली आहेत, म्हणून प्रिय मित्रांनो देहाला व आत्म्याला अशुद्ध करणार्या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भय बाळगून आपल्या पवित्रतेला सिद्ध करू या.
- 2 करिंथकरांस ७:२सुमारे इ.स. ६०
तुमच्या हृदयात आमच्यासाठी जागा करा. आम्ही कोणाविरुद्ध अन्याय केला नाही. आम्ही कोणालाही मार्गभ्रष्ट केले नाही किंवा कोणाचा गैरफायदा घेतला नाही.
- 2 करिंथकरांस ७:३सुमारे इ.स. ६०
तुम्हाला दंडाज्ञा व्हावी म्हणून मी हे सांगत नाही, कारण मी पूर्वीच सांगितले आहे की तुम्हाला आमच्या हृदयात स्थान आहे आणि आम्ही जगू किंवा मरू तेव्हा तुमच्याबरोबर असू.
- 2 करिंथकरांस ७:४सुमारे इ.स. ६०
मी अगदी मोकळेपणाने तुमच्याबरोबर बोलतो; मला तुमचा अतिशय अभिमान आहे. मी खूप उत्तेजित झालो आहे; आमच्या या सर्व दुःखात माझ्या आनंदाला कोणतीच सीमा उरली नाही.
- 2 करिंथकरांस ७:५सुमारे इ.स. ६०
मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक रूपात विसावा मिळाला नाही. आम्ही चहूकडून संकटात होतो; बाहेर कलह व आत भय होते.
- 2 करिंथकरांस ७:६सुमारे इ.स. ६०
मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.
- 2 करिंथकरांस ७:७सुमारे इ.स. ६०
त्याच्या केवळ येण्याने नव्हे परंतु तुम्ही त्याचे जे सांत्वन केले त्यामुळेही, माझ्यासंबंधाने तुमची उत्सुकता, तुमचे अति दुःख, तुमची माझ्यावरील आस्था या सर्वगोष्टी त्याने मला सांगितल्या, तेव्हा माझा आनंद पूर्वीपेक्षाही ओसंडून वाहू लागला.
- 2 करिंथकरांस ७:८सुमारे इ.स. ६०
जरी माझ्या पत्रामुळे मी तुम्हाला दुःख दिले याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. याबद्दल निश्चितच मला दुःख झाले खरे, पण माझ्या पत्राने तुम्हाला थोडाच काळ दुःखी केले हे मी समजतो.
- 2 करिंथकरांस ७:९सुमारे इ.स. ६०
तुम्हाला दुःखी केले म्हणून नव्हे, तर त्या दुःखाने तुम्ही पश्चात्तापाकडे वळलात म्हणून मला आनंद वाटतो. तुमचे दुःखी होणे हे परमेश्वराच्या इच्छेनुसार झाले आणि यामुळे आमच्यामुळे तुमची कोणतीही हानी झाली नाही.
- 2 करिंथकरांस ७:१०सुमारे इ.स. ६०
कारण दैवी दुःखाने पश्चात्ताप व त्याचा परिणाम तारण, परंतु ऐहिक दुःखाने मरण येते.
- 2 करिंथकरांस ७:११सुमारे इ.स. ६०
या दैवी दुःखाने तुमच्यामध्ये काय उत्पन्न केले आहे ते पाहा: किती उत्सुकता, तुम्हाला स्वतः स्पष्ट करण्याची उत्कंठा, किती संताप, किती भय, किती तळमळ, किती आस्था, किती न्याय मिळावा अशी इच्छा आणि या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःस निर्दोष असे सिद्ध केले आहे.
- 2 करिंथकरांस ७:१२सुमारे इ.स. ६०
मी तुम्हाला पत्र लिहिले ते, ज्याने चूक केली त्याच्यासाठी नव्हे आणि ज्याच्याविरुद्ध चूक केली त्यांच्यासाठी सुद्धा नव्हे, तर परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही किती समर्पित आहात हे स्पष्ट करण्यासाठी लिहिले.
- 2 करिंथकरांस ७:१३सुमारे इ.स. ६०
या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले. परंतु याहून अधिक आनंद आम्हाला मिळाला तो तीताच्या आनंदाने! कारण तुम्ही त्याच्या आत्म्याला ताजेतवाने केले.
- 2 करिंथकरांस ७:१४सुमारे इ.स. ६०
मला तुमच्याबद्दल केवढा अभिमान आहे, हे मी त्याला सांगितले होते आणि तुम्ही मला मुळीच निराश केले नाही. जे काही आम्ही तुम्हाला सांगितले ते सर्व खरे होते, तसेच मी तीतापुढे काढलेले तुमच्याबद्दलचे अभिमानाचे शब्दही खरे ठरले आहेत!