circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 2 करिंथकरांस ७:१५सुमारे इ.स. ६०
ज्या रीतीने भयाने व थरथर कापत तुम्ही सर्वांनी आज्ञांकितपणा दाखवून त्याचा स्वीकार केला, या सर्वगोष्टी आठवून, तुमच्याविषयीची त्याची प्रीती अधिक वाढली आहे.
- 2 करिंथकरांस ७:१६सुमारे इ.स. ६०
तुमच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो याचा मला आनंद आहे.
- 2 करिंथकरांस ८:१सुमारे इ.स. ६०
आता, बंधू भगिनींनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर परमेश्वराने जी कृपा केली, ते तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.
- 2 करिंथकरांस ८:२सुमारे इ.स. ६०
अनेक भीषण परीक्षेमध्ये, त्यांचा ओसंडणारा आनंद आणि कमालीच्या दैनावस्थेत त्यांची उदारता प्रत्यक्षात आली.
- 2 करिंथकरांस ८:३सुमारे इ.स. ६०
त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो.
- 2 करिंथकरांस ८:४सुमारे इ.स. ६०
प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली.
- 2 करिंथकरांस ८:५सुमारे इ.स. ६०
आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले.
- 2 करिंथकरांस ८:६सुमारे इ.स. ६०
म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे.
- 2 करिंथकरांस ८:७सुमारे इ.स. ६०
तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे.
- 2 करिंथकरांस ८:८सुमारे इ.स. ६०
याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे.
- 2 करिंथकरांस ८:९सुमारे इ.स. ६०
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
- 2 करिंथकरांस ८:१०सुमारे इ.स. ६०
या गोष्टीसंबंधाने जे तुमच्यासाठी योग्य आहे ते मी तुम्हाला सांगतो: मागील वर्षी तुम्हीच असे होता की ज्यांनी प्रथम देण्यास आरंभ केला. इतकेच केवळ नव्हे, परंतु तशी इच्छाही बाळगण्यामध्ये तुम्ही पुढे होता.
- 2 करिंथकरांस ८:११सुमारे इ.स. ६०
मग एवढ्या इच्छेच्या उत्साहाने आरंभ केलेले हे कार्य ते समाप्त होईपर्यंत तुमच्याजवळ जे असेल ते देऊन पूर्ण करा.
- 2 करिंथकरांस ८:१२सुमारे इ.स. ६०
जर देण्याची तुमची खरोखर इच्छा असेल, तर जे तुमच्याकडे आहे, त्या आधारावर तुमचे दान स्वीकारले जाईल, जे तुमच्याजवळ नाही त्याप्रमाणे नाही.
- 2 करिंथकरांस ८:१३सुमारे इ.स. ६०
आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते.
- 2 करिंथकरांस ८:१४सुमारे इ.स. ६०
या वेळेला सध्या तुमच्या विपुलतेतून ज्याकाही त्यांच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील, पुढे त्यांच्या विपुलतेतून ज्या तुमच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील. आमचे ध्येय समानता असावी असे आहे.
- 2 करिंथकरांस ८:१५सुमारे इ.स. ६०
याबाबतीत शास्त्रलेख काय म्हणतो: “ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही, आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही.”
- 2 करिंथकरांस ८:१६सुमारे इ.स. ६०
जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.
- 2 करिंथकरांस ८:१७सुमारे इ.स. ६०
त्याने आमची विनंती आनंदाने मान्य केली इतकेच केवळ नव्हे तर तो फारच उत्साहाने व स्वतःच्या इच्छेने आपणास भेटावयास येत आहे.
- 2 करिंथकरांस ८:१८सुमारे इ.स. ६०
शुभवार्तेच्या सेवेसाठी ज्याची प्रशंसा सर्व मंडळ्यातून होत आहे अशा एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवित आहे.
- 2 करिंथकरांस ८:१९सुमारे इ.स. ६०
खरे म्हणजे, आम्ही कृपेचे दान घेऊन येत असताना आमच्याबरोबर प्रवास करण्यासाठी या बंधुची मंडळ्यांमधून निवड झाली होती. यामुळे केवळ प्रभूचे गौरव होईल व साहाय्य करण्याविषयीची आमची मदत करण्याची आस्था सर्वांना दिसून येईल.
- 2 करिंथकरांस ८:२०सुमारे इ.स. ६०
कारण ही उदारतेने साहाय्यता म्हणून दिलेली देणगी आम्ही कशी हाताळतो याबाबतीत कोणालाही टीका करण्याचा प्रसंग मिळू नये, म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत.
- 2 करिंथकरांस ८:२१सुमारे इ.स. ६०
फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो.
- 2 करिंथकरांस ८:२२सुमारे इ.स. ६०
मी तुमच्याकडे आणखी एका बंधूला पाठवित आहे. तो पुष्कळ प्रकारे आस्थेवाईक असल्याचे आम्हाला अनुभवाने माहीत आहे, कारण त्याचा तुमच्यावर अधिक भरवसा आहे.
- 2 करिंथकरांस ८:२३सुमारे इ.स. ६०
तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत.