- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
मार्क१
Listen to this chapter
0:00
0:00
सुवार्तेचा आरंभ
१
परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ.
२
यशायाह संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन, तो तुझा मार्ग तयार करेल,”
३
“अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”
४
आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला.
५
यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमातील लोक त्याच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे.
६
योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कापडाचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधत असे. तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे.
७
त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर एकजण येत आहे, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही.
८
मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.”
येशूचा बाप्तिस्मा
९
त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला.
१०
येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले
११
त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
रानात येशूची परीक्षा
१२
नंतर लगेच पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात पाठविले,
१३
रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली.
येशू गालीलमधील सेवा आरंभतो
१४
योहानाला बंदिवासात टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले.
१५
ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!”
१६
एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते.
१७
येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.”
१८
लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
१९
थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले.
२०
त्यांनी उशीर न करता त्यांना बोलाविले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले.
कफर्णहूममध्ये येशूचा अधिकार
२१
ते कफर्णहूम येथे गेले, आणि शब्बाथ आला तेव्हा सभागृहामध्ये जाऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली.
२२
त्यांच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.
२३
इतक्यात, सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला,
२४
“हे नासरेथकर येशू, तुम्हाला आमच्याशी काय काम? तुम्ही आमचा नाश करावयास आले काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!”
२५
“गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!”
२६
त्या अशुद्ध आत्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला.
२७
हे पाहून सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते अशुद्ध आत्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.”
२८
त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली.
बरे करण्याचा एक दिवस
२९
सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहानासह शिमोन व आंद्रियाच्या घरी गेले.
३०
तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले.
३१
येशू तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिचा हात धरून तिला उठविले. तेव्हा एकाएकी तिचा ताप नाहीसा झाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
३२
त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी लोकांनी येशूंकडे सर्व रोग्यांना आणि भूतग्रस्तांना आणले.
३३
संपूर्ण शहर दारात गोळा झाले होते,
३४
तेव्हा येशूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांनी ग्रासलेल्या पुष्कळांना बरे केले व अनेक दुरात्म्यांना हाकलून दिले, परंतु दुरात्म्यांना बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते कोण आहेत, हे त्यांना माहीत होते.
३५
अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली.
३६
शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तिथे गेले.
३७
ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहे!”
३८
येशूंनी म्हटले, “आपण दुसरीकडे कुठेतरी आसपासच्या गावात जाऊ म्हणजे मला तिथे प्रवचन देता येईल कारण त्यासाठीच मी आलो आहे.”
३९
मग ते सर्वत्र गालील प्रांतात प्रवास करीत, त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले.
येशू कुष्ठरोग्याला बरे करतो
४०
एक कुष्ठरोगी येशूंकडे आला आणि गुडघे टेकून विनंती करून म्हणाला, “तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”
४१
येशूंना कळवळा आला. त्यांनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो!”
४२
त्याचा कुष्ठरोग निघून गेला आणि तो शुद्ध झाला.
४३
येशूंनी त्याला निक्षून सांगितले:
४४
“पाहा हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते, ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस याचे हे प्रमाण प्रत्येकाला पटेल.”
४५
याउलट, त्याने ही बातमी जाहीरपणे सांगून पसरविली की त्यामुळे येशूंना उघडपणे गावात प्रवेश करता येईना, म्हणून ते एकांतस्थळी राहिले. पण तिथेही चहूकडून लोक त्यांच्याकडे आले.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Options
Study Note