Skip to content

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचेच पाऊल त्याला पाशात अडकवितात; आणि त्याच्या जाळ्यात तो सापडतो.

  2. फास त्याची टाच पकडते; आणि तो सापळ्यात धरला जातो.

  3. त्याच्यासाठी गळफास जमिनीत लपविलेला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवलेला आहे.

  4. आतंक त्याला चहूकडून घेरून आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलांवर कुत्र्यांचे भय आहे.

  5. विपत्ती त्याच्यासाठी भुकेलेली आहे; तो पडला तर, विनाश त्याच्यासाठी तयारच आहे.

  6. रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे; मृत्यूचे पहिले अपत्य त्याचे अवयव गिळून टाकतात.

  7. त्याच्या सुरक्षित डेर्‍यांतून त्याला फाडून भयाच्या राजापुढे त्याला फरफटीत नेले आहे.

  8. अग्नी त्याच्या डेर्‍यात वस्ती करते; त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे.

  9. त्याची मुळे खाली सुकतात आणि त्याच्यावर सर्व फांद्या वाळून जातात.

  10. पृथ्वीवरून त्याच्या अस्तित्वाची आठवण नाहीशी होते; आणि आता भूमीवर त्याचे नाव राहणार नाही.

  11. प्रकाशातून त्याला अंधाराच्या राज्यात घालविले आहे; आणि जगातून तो हद्दपार केला गेला आहे.

  12. त्याच्या लोकात त्याला पुत्र किंवा कोणीही वारस नाहीत, तो जिथे राहत होता, तिथेही कोणी उरले नाहीत.

  13. पश्चिमेचे लोक त्याची अवस्था बघून भयप्रद होतात; हा भयंकर अंत पाहून पूर्वेकडील लोक घाबरून जातात.

  14. पातक्यांचे जीवन खचितच असे असते; परमेश्वराला जे ओळखीत नाहीत, त्यांचे ठिकाण असेच असते.”

  15. की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.

  16. जरी देवहीन मनुष्याचा गर्व आकाशापर्यंत पोहोचला आणि त्याचे डोके आभाळाला जाऊन भिडले,

  17. तरी तो आपल्या स्वतःच्या विष्ठेप्रमाणे नष्ट होणार; जे त्याला ओळखीत होते, ते विचारीत राहतील, ‘तो कुठे आहे?’

  18. तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही. रात्रीच्या दृष्‍टांताप्रमाणे तो नाहीसा होईल.

  19. ज्यांनी त्याला पाहिले होते, ते त्याला पुन्हा पाहणार नाहीत; त्याचे स्थान त्याच्याकडे पुन्हा पाहणार नाही.

  20. त्याची मुलेबाळे गरिबांची नुकसान भरपाई करतील; आणि स्वतःच्या हातांनी आपली संपत्ती परत करतील.

  21. तारुण्याचा जो जोम त्याच्या हाडात भरलेला आहे तो त्याच्याबरोबरच धुळीत मिळेल.

  22. “जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते आणि तो आपल्या जिभेखाली ते दाबून ठेवतो,

  23. ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते म्हणून हळूहळू चघळत राहतो,

  24. तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही; त्याच्या पोटात ते सापाच्‍या विषासारखे होईल.

  25. गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार; परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल.