Skip to content

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सूर्यप्रकाशात भरपूर पाणी दिलेल्या रोपट्यासारखे ते होतात. त्यांच्या फांद्या बागेत सर्वत्र पसरतात.

  2. त्याची मुळे दगडांच्या चोहो बाजूंना वेढतात. आणि त्यांच्यामध्ये आपली जागा शोधतात.

  3. परंतु जेव्हा त्याला त्याच्या जागेवरून उपटून टाकले जाते, तर ती जागा त्याला नाकारून म्हणते, ‘मी तुला कधीही पाहिले नाही.’

  4. हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात, आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात— ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.

  5. अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल? कोणीही नाही!

  6. तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो, तो किती कमी दर्जाचा असावा!

  7. दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर, तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो.

  8. त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात; सर्वकाही चांगले असताना विध्वंसक त्याच्यावर हल्ला करतो.

  9. अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही; तलवारीसाठी त्याला नेमले आहे.

  10. गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो; अंधकाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला माहीत आहे.

  11. संकट व चिंता त्याला घाबरे करतात; हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात,

  12. कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्‍या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,

  13. त्यांच्या विरोधात अपमानाने जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो.

  14. “कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे; त्याच्या कंबरेवर मांस चढले आहे,

  15. पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल, कोणी राहत नाही अशा ठिकाणी, तुकडे पडलेल्या घरामध्ये त्याचा डेरा असेल.

  16. त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही, ना पृथ्वीवर त्याची मालमत्ता वाढणार.

  17. त्याला अंधकारातून सुटका नाही; अग्नीने त्याचा अंकुर जळून जाईल, परमेश्वराचा मुखश्वास त्याला दूर वाहून नेईल.

  18. निरर्थक धनावर विसंबून राहून त्याने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, कारण त्याला त्याचा काही लाभ मिळणार नाही.

  19. त्याच्या ठरलेल्या वेळे आधी तो गळून जाईल, आणि त्याच्या फांद्या भरभराट पावणार नाहीत.

  20. न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा, बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल.

  21. कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील, आणि लाच घेणार्‍यांचे डेरे अग्नी जाळून टाकील.

  22. ते क्लेशाची गर्भधारणा करतात आणि दुष्टतेला जन्म देतात; आणि त्यांचे गर्भाशय कपट प्रसवते.”

  23. “दुष्टांचा दिवा विझून जातो; त्याच्या अग्नीच्या ज्वाला पेटावयाच्या थांबतात.

  24. त्याच्या तंबूतील प्रकाश अंधकार होऊन होतो; त्याच्या जवळचा दिवा विझून जातो.

  25. त्याच्या पावलांचा प्रभाव दुर्बल होतो; त्याच्या स्वतःच्याच योजना त्याला खाली खेचतात.