Skip to content

Wicked बद्दल बायबलमधील वचने: Prayer of

43 वचने · 18 पैलू

Prayer of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यानंतर तुम्ही परत येऊन याहवेहसमोर शोक करू लागलात, परंतु त्यांनी तुमच्या रडण्याकडे लक्ष दिले नाही.

  2. पण तुमच्यामुळे याहवेह माझ्यावर रागावले आणि त्यांनी त्या वचनदत्त देशात मला जाऊ दिले नाही. ते मला म्हणाले, “पुरे कर. ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नकोस.

  3. त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.

  4. जेव्हा त्यांच्यावर संकट येईल, तेव्हा परमेश्वर त्यांची आरोळी ऐकेल काय?

  5. परंतु दुष्टाच्या अहंकारामुळे जेव्हा ते लोक आरोळी मारतात तेव्हा परमेश्वर उत्तर देत नाहीत.

  6. खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत; सर्वसमर्थ त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत.

  7. त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.

  8. मी माझी पातके माझ्या अंतःकरणात ठेवली असती, तर परमेश्वराने माझा धावा ऐकला नसता;

  9. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  10. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  11. यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—

  12. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.

  13. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,

  14. याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते.

  15. याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.

  16. जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही.

  17. दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे— तर मग जेव्हा वाईट हेतूने अर्पण आणले जाते ते किती तिरस्करणीय असेल!

  18. जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात.

  19. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

  20. मी गुप्तपणे, एखाद्या अंधार्‍या ठिकाणाहून बोललो नाही; मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही, ‘माझा व्यर्थच शोध घ्या.’ मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो; जे योग्य आहे तेच घोषित करतो.

  21. परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे; तुमच्या पापांनी त्यांचे मुख तुमच्यापासून लपविले आहे, जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही.

  22. म्हणून याहवेह असे म्हणाले: ‘मी त्यांच्यावर घोर आपत्ती घेऊन येणार त्यातून त्यांची सुटका होणार नाही. ते रडून दयेसाठी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.

  23. जर ते उपवास करतील, तरी मी त्यांच्या रडण्याकडे मुळीच लक्ष देणार नाही; मला ते होमार्पणे आणि अन्नार्पणे आणतील, मी त्यांचा स्वीकार करणार नाही. याउलट तलवार, दुष्काळ व रोगराई यांनी मी त्यांची परतफेड करेन.”

  24. तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!

  25. जसा पूर्वेकडील वारा धूळ उडवितो, त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे उडवेन; त्यांच्या दुर्दशेच्या दिवशी मी माझे मुख नव्हे, तर त्यांच्याकडे पाठ फिरवेन.”