Wicked बद्दल बायबलमधील वचने: Described
Described बद्दल वचने
सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते.
मग याहवेहने म्हटले, “सदोम आणि गमोरा विरुद्ध आक्रोश खूप वाढला आहे आणि त्यांचे पाप गंभीर आहे.
भूमीसुद्धा भ्रष्ट झाली होती; म्हणून तिच्या पापाबद्दल मी तिला शिक्षा केली आहे, भूमीने तेथील रहिवाशांना देशाबाहेर ओकारीसारखे फेकून दिले आहे.
याहवेह मला म्हणाले, “मी या लोकांना ओळखतो, हे ताठ मानेचे लोक आहेत.
मी तुम्हाला ओळखतो, त्या दिवसापासून तुम्ही याहवेहविरुद्ध बंड करीत आहात.
एका मरुभूमीत त्यांना ते भेटले ते घोर व भयाण अरण्य होते. त्यांनी त्याचे जतन व संरक्षण केले; त्यांच्या डोळ्यातील बाहुलीसारखे त्याचे रक्षण केले,
त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते, आणि गमोराच्या मळ्यातून येते. त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत, आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत.
त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष, ते नागांचे घातक विष आहे.
जशी प्राचीन काळाची म्हण ‘दुष्टापासून दुष्टाई येते,’ म्हणून माझा हात तुम्हाला स्पर्श करणार नाही.
अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस.
आणि आता तुमचा असा उद्देश आहे की, यहूदीया आणि यरुशलेममधील स्त्री-पुरुषांना तुमचे गुलाम बनवावे. परंतु तुमचे परमेश्वर याहवेह यांच्याविरुद्ध केलेल्या पापाबद्दल तुम्हीदेखील दोषी नाहीत का?
त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.
तुमचे सेवक संदेष्टे, त्यांनी आम्हाला आधीच इशारा देऊन ठेवला होता: ‘जो देश आम्हाला वतन म्हणून मिळेल, तो देश तिथे राहणार्या लोकांच्या भयंकर अमंगळ चाली व कृत्ये यांनी भ्रष्ट झालेला असेल. खरोखरच आज देशाच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यत तो अपवित्रतेने भरलेला आहे.
अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल? कोणीही नाही!
तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो, तो किती कमी दर्जाचा असावा!
दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर, तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो.
त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात; सर्वकाही चांगले असताना विध्वंसक त्याच्यावर हल्ला करतो.
अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही; तलवारीसाठी त्याला नेमले आहे.
गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो; अंधकाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला माहीत आहे.
संकट व चिंता त्याला घाबरे करतात; हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात,
कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,
त्यांच्या विरोधात अपमानाने जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो.
“कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे; त्याच्या कंबरेवर मांस चढले आहे,
पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल, कोणी राहत नाही अशा ठिकाणी, तुकडे पडलेल्या घरामध्ये त्याचा डेरा असेल.
त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही, ना पृथ्वीवर त्याची मालमत्ता वाढणार.