Wicked बद्दल बायबलमधील वचने: Spirit of God withdrawn from
Spirit of God withdrawn from बद्दल वचने
तेव्हा याहवेह म्हणाले, “माझा आत्मा मानवासोबत वादविवाद करीत राहणार नाही, कारण ते दैहिक आहेत आणि त्यांचा जीवनकाल एकशेवीस वर्षे असेल.”
एफ्राईम मूर्तीबरोबर जोडले गेले आहे, त्याला एकटे सोडून द्या!
जेव्हा त्यांचे मद्य संपते तेव्हा सुद्धा, ते त्यांचा वेश्याव्यवसाय चालू ठेवतात; त्यांचे शासक लज्जास्पद कृतिंवर अधिक प्रीती करतात.
एक वावटळ त्यांना वाहून नेईल, आणि त्यांच्या अर्पणांमुळे त्यांना लाज वाटेल.
याकरिता परमेश्वरानेही त्यांना हृदयाच्या पापी वासना व सर्वप्रकारच्या लैंगिक अशुद्धतेच्या अधीन होऊ दिले आणि त्यांनी आपल्या शरीराची आपसात मानहानी केली.
या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले.
यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.