Skip to content

Wicked बद्दल बायबलमधील वचने: Prosperity of

60 वचने · 18 पैलू

Prosperity of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले, परंतु अचानक त्याचे घर शापित झाले.

  2. त्यांची मुलेबाळे सुरक्षित नाहीत, वेशीत ते चिरडली जातात व त्यांना सोडविणारा कोणी नाही.

  3. त्यांच्या कापणीचा हंगाम भुकेले खाऊन टाकतात काट्याकुट्यातून सुद्धा ते काढून नेतात; आणि कारस्थानी त्याच्या धनाचा लोभ धरतात.

  4. हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात, आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात— ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.

  5. त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात; सर्वकाही चांगले असताना विध्वंसक त्याच्यावर हल्ला करतो.

  6. गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो; अंधकाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला माहीत आहे.

  7. “कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे; त्याच्या कंबरेवर मांस चढले आहे,

  8. त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही, ना पृथ्वीवर त्याची मालमत्ता वाढणार.

  9. की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.

  10. त्याच्या भरभराटीत विपत्ती त्याला गाठेल; आणि त्याच्यावर मोठ्या यातना येऊन पडतील.

  11. दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते, वयाने परिपक्व होऊन ते सशक्त का होतात?

  12. त्यांची मुले त्यांच्याभोवती स्थिर झालेली त्यांना दिसतात, आणि त्यांचे वंशज त्यांच्या दृष्टीपुढे असतात.

  13. त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात; परमेश्वराचा दंड त्यांच्यावर नसतो.

  14. त्यांचा बैल निष्फळ असत नाही; त्यांच्या गाई वासरांना जन्म देतात आणि त्यांचा गर्भपात होत नाही.

  15. ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात; आणि त्यांची लेकरे नाचत बागडतात.

  16. डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात; आणि बासरीच्‍या स्‍वरावर हर्षनाद करतात.

  17. ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात आणि शांतीने खाली कबरेत जातात.

  18. दावीदाचे स्तोत्र. दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्‍यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.

  19. मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे. तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता.

  20. परंतु तो लवकरच नाहीसा झाला; मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही.

  21. सुज्ञ माणसेही मरण पावतात, हे प्रत्येकाला दिसते; मूर्ख व अज्ञानी माणसेही मरण पावतात, ते आपली संपत्ती दुसर्‍यांसाठी ठेवून जातात.

  22. त्यांनी आपल्या जमिनीला स्वतःची नावे दिलेली असली, तरी त्यांची थडगीच त्यांची कायमची घरे होतील; ती त्यांची पिढ्यान् पिढ्या वसतिस्थाने असतील.

  23. परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.

  24. ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे, व जे त्यांच्याशी सहमत आहेत, त्यांचेही असेच होणार. सेला

  25. ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.