Wicked बद्दल बायबलमधील वचने: Contrasted with the righteous
Contrasted with the righteous बद्दल वचने
धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.
पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.
परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्याने उडून जाणार्या भुश्यासारखे आहेत.
म्हणून दुष्ट न्यायसभेत, किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.
कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.
याहवेह नीतिमानाला पारखतात; परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे, अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात.
याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा, ज्यांना याच जीवनात प्रतिफळ आहे. जी शिक्षा तुम्ही दुष्टांसाठी साठवून ठेवलेली आहे त्यानेच त्यांचे पोट भरो, त्यांची संततीही तेच आधाशीपणे खाओ, आणि त्यांचे उरलेले पुढच्या संततीलाही मिळो.
मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार; मी जागा होईन, तेव्हा तुमच्या दर्शनाने माझे पूर्ण समाधान होईल.
दुर्जनांवर अनेक दुःखे येतात. परंतु जे याहवेहवर विश्वास ठेवतात, त्यांच्याभोवती त्यांच्या अक्षयप्रीतीचे वेष्टण असते.
दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल, परंतु याहवेह नीतिमानांना आधार देतात.
निर्दोष लोकांच्या दिवसांवर याहवेहचे लक्ष असते, आणि त्यांचे वतन सर्वकाळ टिकते.
कठीण काळी ते लज्जित होणार नाही; दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल.
पण दुष्ट लोक मात्र नष्ट होतील: याहवेहचे शत्रू हे मैदानातील फुलांप्रमाणे वाळून जातील आणि धुराप्रमाणे दिसेनासे होतील.
दुष्ट लोक उसने घेतात पण फेडीत नाहीत, परंतु नीतिमान उदारपणे देत असतो;
याहवेह ज्यांना आशीर्वाद देतात, ते पृथ्वीचे वतन पावतील, परंतु जे शापित आहेत, ते नष्ट होतील.
सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे.
परंतु सर्व पापी लोक नष्ट केले जातील; आणि त्याची संतती छाटली जाईल.
एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात, कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात; परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.
आसाफाचे स्तोत्र. निश्चितच परमेश्वर इस्राएलसाठी, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, त्यांच्यासाठी चांगले आहेत.
माझ्याविषयी म्हणाल, तर माझे पाय अडखळू लागले होते; माझी पावले घसरण्याच्या बेतास आली होती.
कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो.
होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात.
इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत आणि इतरांप्रमाणे आजाराने पीडलेही जात नाहीत.
अहंकार त्यांच्या गळ्यातील माळ; हिंसा त्यांची वस्त्रे आहेत.