Skip to content

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.

  2. मधाने भरलेल्या नद्या आणि झरे जे लोण्याच्‍या प्रवाहाने वाहतात, त्यांचा उपभोग त्याला घेता येणार नाही.

  3. ज्यासाठी त्याने परिश्रम केले, त्याची चव त्याला मिळणार नाही; त्याच्या व्यापाराचा नफा त्याला मिळणार नाही.

  4. कारण त्याने गोरगरिबांवर जुलूम करून त्यांना निराधार सोडले; जी घरे त्याने बांधली नाहीत, ती त्याने जप्त केली.

  5. “त्याच्या हावेपासून त्याला कधीही सुटका मिळणार नाही; त्याची संपत्ती त्याला वाचवू शकणार नाही.

  6. गिळून टाकावे असे आता काही उरले नाही; त्याची समृद्धी दीर्घकाल टिकणार नाही.

  7. त्याच्या भरभराटीत विपत्ती त्याला गाठेल; आणि त्याच्यावर मोठ्या यातना येऊन पडतील.

  8. जेव्हा त्याने पोटभरून खाल्ले असणार, तेव्हा परमेश्वराचा प्रचंड कोप त्याच्याविरुद्ध पेटेल आणि त्याच्यावर त्यांच्या क्रोधाची वृष्टी होईल.

  9. लोखंडी शस्‍त्रांपासून त्याने जरी पळ काढला, तरी कास्य धनुष्‍यबाण त्याच्या पार जाईल.

  10. बाण त्याच्या पाठीतून तो ओढून काढेल, आणि त्याचे चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल. तो भीतीने ग्रस्त होईल.

  11. निबिड अंधकार त्याच्या संपत्तीची वाट पाहत आहे, अग्नी त्याला भस्म करेल आणि त्याच्या तंबूमध्ये जे काही उरलेले आहे ते गिळून टाकेल.

  12. आकाश त्याचे दोष प्रकट करेल; आणि पृथ्वी त्याच्याविरुद्ध उभी राहील.

  13. त्याचे घर पुराने वाहून जाईल, परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्याची सर्व संपत्ती पाण्याच्या ओघात नष्ट होईल.

  14. दुष्ट मनुष्याचा परमेश्वराने हाच वाटा नेमलेला आहे, परमेश्वराने त्यांच्याकरिता नेमलेला वारसा तो हाच आहे.”

  15. दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते, वयाने परिपक्व होऊन ते सशक्त का होतात?

  16. त्यांची मुले त्यांच्याभोवती स्थिर झालेली त्यांना दिसतात, आणि त्यांचे वंशज त्यांच्या दृष्टीपुढे असतात.

  17. त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात; परमेश्वराचा दंड त्यांच्यावर नसतो.

  18. त्यांचा बैल निष्फळ असत नाही; त्यांच्या गाई वासरांना जन्म देतात आणि त्यांचा गर्भपात होत नाही.

  19. ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात; आणि त्यांची लेकरे नाचत बागडतात.

  20. डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात; आणि बासरीच्‍या स्‍वरावर हर्षनाद करतात.

  21. ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात आणि शांतीने खाली कबरेत जातात.

  22. तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.

  23. हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’

  24. परंतु त्यांची समृद्धी त्यांच्या स्वतःच्या हातात नाही, म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर थांबतो.

  25. “तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?