मुख्य मजकुरावर जा

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते कितीदा वार्‍यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात, व वादळापुढे उडविलेल्या भुशासारखे उडून जातात?

  2. असे म्हटले जाते, ‘परमेश्वर दुर्जनांची शिक्षा त्याच्या संततीसाठी राखून ठेवतात.’ दुर्जनालाच स्वतःच्या पापाची परतफेड करू द्यावी, म्हणजे त्याला त्याचा अनुभव येईल!

  3. आपला नाश होत आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे; सर्वसमर्थाच्या क्रोधाचा प्याला त्याने प्यावा.

  4. जेव्हा त्याला नेमून दिलेला काळ समाप्त होतो तेव्हा आपण आपल्यामागे सोडून दिलेल्या कुटुंबाविषयी त्याला काय चिंता?

  5. “परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल, कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात?

  6. एखादा मनुष्य पूर्ण जोमात असताना मरण पावतो, जो सुरक्षित आणि सुखी असतो,

  7. जो शरीराने सुदृढ, आणि हाडांनी धष्टपुष्ट आहे.

  8. आणि दुसरा एखादा जिवाच्या कडूपणात मरतो, ज्याने जीवनात कोणत्याही चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नसतो.

  9. तरी ते दोघेही मेल्यानंतर मातीत एकमेका शेजारी पुरले जातात, आणि दोघेही किड्यांनी झाकले जातात.

  10. “आता तुम्ही काय विचार करतात हे मला चांगले माहिती आहे, माझे वाईट होईल अशा योजना तुम्ही करता.

  11. तुम्ही विचारता, ‘त्या महान व्यक्तीचे घर कुठे आहे, ज्यात दुष्टाचा डेरा होता?’

  12. जे प्रवास करतात त्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारला नाही काय? आणि त्यांच्या अनुभवांकडे लक्ष दिले नाही काय—

  13. अरिष्टाच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो, आणि क्रोधाच्या दिवशी ते सोडविले जातात?

  14. उघडपणे त्यांना कोण दोष लावणार? त्यांनी जे केले आहे, त्याचे प्रतिफळ त्यांना कोण देणार?

  15. त्यांना कबरेकडे वाहून नेले जाते, आणि त्यांच्या धोंड्यावर पहारा ठेवतात.

  16. दरीतील माती त्याला गोड लागते; असंख्य त्यांच्यापुढे गेले आहेत, आणि सर्व लोक त्यांचे अनुसरण करतात.

  17. तुझी दुष्टता पुष्कळ नाही का? तुझे अपराध अनंत नाही का?

  18. “परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर; म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल.

  19. त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेव.

  20. जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्‍यातून दुष्टता काढून टाकशील: तर तू पुनर्स्थापित होशील.

  21. जर तू आपले सोने धुळीत मिळवशील, आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील,

  22. तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने, आणि तुझे मौल्यवान रुपे होतील.

  23. मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्‍ये आनंद पावशील व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील.

  24. तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील.

  25. ज्याची तू इच्छा धरशील, ते घडून येईल, आणि तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल.