- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
The First Temple बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.
जे मंदिर मी बांधणार आहे ते अत्यंत विशाल व भव्य असेल, म्हणून लाकडाचा फारच मोठा साठा लागेल.
तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर झोडलेला गहू, वीस हजार कोर जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.”
“माझ्याकडे असलेला अत्यंत निष्णात असा हुराम-आबी हा कारागीर मी तुमच्याकडे पाठवित आहे.
त्याची आई दान येथील एक इस्राएली स्त्री असून त्याचा पिता सोरचा आहे. सोन्याचांदीच्या कामाची तसेच कास्य व लोखंडी, दगडकाम, सुतारकी, जांभळा, निळा व किरमिजी रंगाच्या सुताचे व तलम कापडाच्या विणकामाची त्याला संपूर्ण माहिती आहे. तो उत्तम कोरीव काम जाणणारा असून त्याला देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. तो तुमच्याकडील कामगार आणत असे तुमचे पिता व माझा प्रभू दावीद राजे यांनी नेमणूक केलेल्या तुमच्या कारागिरांबरोबर काम करेल.
शलोमोनाने, त्याचा पिता दावीदाने केल्यानंतर, इस्राएल देशातील सर्व परदेशी लोकांची मोजणी केली; मोजणीत 1,53,600 परदेशी लोक आढळले.
त्यातून त्याने 70,000 कष्टकरी मजूर, डोंगरात 80,000 पाथरवट व यांच्यावर देखरेख करण्यास 3,600 मुकादम यांची नियुक्ती केली.
मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती.
शलोमोन राजाने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बांधकामास सुरुवात केली.
परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाने पाया घातला, त्याची लांबी साठ हात आणि रुंदी वीस हात होती.
मंदिरापुढील द्वारमंडपाची लांबी मंदिराच्या रुंदीएवढीच म्हणजेच वीस हात व उंचीही वीस हात होती. त्याच्या आतील भाग शुद्ध सोन्याने मढविलेला होता.
मंदिराचा दिवाणखाना त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी करून ती सोन्याने मढविली व तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्यांची नक्षीचे कोरीव काम केले होते.
मंदिर मोलवान रत्नांनी सजविले होते. परवाईम नामक ठिकाणी मिळणारे सोने वापरण्यात आले होते.
त्याने मंदिराच्या छताचे वासे, दारांच्या चौकटी, भिंती आणि मंदिराचे दरवाजे सोन्याने मढविले, भिंतींवर करुबाची आकृती कोरली.
करुबांच्या पंखांची एकूण लांबी वीस हात होती. पहिल्या करुबाचा एक पंख पाच हात लांब होता आणि तो मंदिराच्या भिंतीला लागून होता, तर त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब असून दुसऱ्या करुबाच्या पंखाला लागून होता.
त्याचप्रमाणे दुसऱ्या करुबांचा एक पंख पाच हात लांब आणि मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागून होता आणि त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब आणि पहिल्या करुबाच्या पंखाला लागून होता.
या करुबांचे पंख वीस हात पसरलेले होते. मुख्य दिवानखाण्याकडे तोंड करून ते त्यांच्या पायांवर उभे होते.
त्याने करुबांच्या आकाराची कशिदा केलेले निळ्या, जांभळ्या व किरमिजी धाग्यांचे आणि तागाच्या कापडाचे पडदे तयार केले.
मंदिराच्या समोरील भागासाठी त्याने दोन आधारस्तंभ तयार केले जे एकत्र मिळून पस्तीस हात लांब होते, प्रत्येक स्तंभावर पाच हात उंचीचा कळस होता.
त्याने एकमेकात गुंफून विणलेल्या साखळ्या बनविल्या आणि त्या आधारस्तंभाच्या टोकांवर ठेवल्या. त्याने शंभर डाळिंबेसुद्धा तयार केली आणि त्यांना साखळ्यांना लागून जोडले.
त्याने मंदिराच्या समोर आधारस्तंभ बांधले, एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे असे ते उभारले. दक्षिणेकडील खांबाला त्याने याखीन असे नाव दिले आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले.
नंतर त्याने याजकांसाठी एक अंगण व जनतेसाठी एक मोठे अंगण तयार केले व त्यांचे दरवाजे कास्य धातूने मढविले.
याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने त्याचा पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि इतर सामान—शलोमोनाने त्या वस्तू परमेश्वराच्या मंदिराच्या भांडार्यात ठेवल्या.
तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले.
आणि इस्राएलचे सर्व लोक सातव्या महिन्यातील सणाच्या काळात राजाकडे एकत्र आले.