मुख्य मजकुरावर जा

The First Temple बद्दल बायबलमधील वचने

365 वचने · 72 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  2. अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”

  3. “यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: “ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’

  4. म्हणून तुमच्यामुळे, सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.

  5. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.”

  6. येशू म्हणाले, “हे मंदिर तुम्ही नष्ट करा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.”

  7. परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते.

  8. परंतु तो शलोमोन होता ज्याने परमेश्वरासाठी भवन बांधले.

  9. “तथापि, सर्वोच्च परमेश्वर मानवी हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाहीत. ज्याप्रमाणे संदेष्टा असे म्हणतो:

  10. तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का?

  11. तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही;

  12. आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”

  13. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत.

  14. त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे.

  15. त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात.