The First Temple बद्दल बायबलमधील वचने: Repaired by Jehoash at the institution of Jehoiada
Repaired by Jehoash at the institution of Jehoiada बद्दल वचने
यहोआश याजकांना म्हणाला, “याहवेहच्या मंदिरात पवित्र अर्पण म्हणून आणलेले सर्व पैसे, शिरगणतीत जमा केलेले पैसे, वैयक्तिक नवसातून मिळालेले पैसे आणि मंदिरात स्वेच्छेने आणलेले सर्व पैसे जमा करा.
प्रत्येक याजकाने त्याच्या खजिनदारांपैकी एकाकडून पैसे घ्यावे आणि नंतर मंदिरात जी काही मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करावी.”
परंतु यहोआश राजाच्या कारकिर्दीतील तेवीस वर्षापर्यंत याजकांनी मंदिराची डागडुजी केली नव्हती.
तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजकांना बोलाविले आणि विचारले, “तुम्ही मंदिराची डागडुजी अजूनही का केली नाही? तुमच्या खजिनदारांकडून आणखी पैसे घेऊ नका, तर तो पैसा आता मंदिराच्या डागडुजीसाठी देण्यात यावा.”
मग याजकांनी सहमती दर्शविली की ते लोकांकडून आता पैसा घेणार नाही आणि तसेच ते मंदिराची डागडुजी देखील करणार नाही.
यहोयादा याजकाने एक पेटी घेतली व तिच्या झाकणाला एक छिद्र पाडले. ती पेटी त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वेदीच्या उजव्या बाजूला ठेवली. प्रवेशद्वाराचे पहारेकरी याजक याहवेहच्या मंदिरात आणलेले सर्व पैसे पेटीत घालू लागले.
जेव्हाही ते पाहत की पेटीमध्ये अधिक पैसा जमा झाला आहे, तेव्हा राजाचा चिटणीस आणि प्रमुख याजक येत आणि याहवेहच्या मंदिरात आलेला पैसा मोजून पिशव्यांत भरून ठेवीत असे.
रक्कम मोजून आणि तोलून झाल्यानंतर मंदिराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या माणसांना पैसे देण्यात येत असत. त्याद्वारे त्यांनी याहवेहच्या मंदिरावर काम करणारे सुतार आणि बांधकाम करणारे,
गवंडी आणि दगड फोडणारे यांना पैसे दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी लाकूड आणि दगड घडविणे केले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे इतर सर्व खर्च पूर्ण केले.
जो पैसा मंदिरामध्ये आणत होते याच्यात याहवेहच्या मंदिरात वापरण्यात येणारे चांदीचे पेले, कातऱ्या, वाट्या, कर्णे किंवा सोन्या-चांदीच्या इतर साहित्य यावर खर्च करण्यात आला नाही;
तर हा पैसा कामगारांना पुरविला जात होता जे याहवेहच्या मंदिराची डागडुजी करीत होते.
काही काळानंतर योआशाने याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले.
त्याने याजकांना आणि लेवींना एकत्र बोलाविले आणि त्यांना सांगितले, “यहूदीयाच्या गावांकडे जा आणि तुमच्या परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी सर्व इस्राएल लोकांकडून वार्षिक देय रक्कम गोळा करा. आताच हे करा.” परंतु लेवी लोकांनी त्यावर तत्काळ हालचाल केली नाही.
तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “याहवेहचा सेवक मोशे आणि इस्राएलच्या सभेचे लोक यांनी लावलेला करार नियमांच्या तंबूसाठी लावलेला कर यहूदीया आणि यरुशलेममधून आणण्याची मागणी तुम्ही लेवींकडे का केली नाही?”
आता अथल्याह या दुष्ट स्त्रीच्या मुलांनी परमेश्वराचे मंदिर तोडून त्यात प्रवेश केला होता आणि याहवेहच्या घराच्या सर्व पवित्र वस्तूंचा सुद्धा बआल दैवतांसाठी वापर केला होता.
राजाच्या आज्ञेनुसार, एक पेटी तयार केली गेली आणि बाहेर याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली.
तेव्हा यहूदीया आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा देण्यात आली की, परमेश्वराचा सेवक मोशे याने अरण्यात इस्राएलचा जो कर मागितला होता तो त्यांनी याहवेहकडे आणावा.
सर्व अधिकारी आणि सर्व लोकांनी आनंदाने त्यांची वर्गणी आणली आणि ती पेटी पूर्ण भरेपर्यंत त्यात टाकत राहिले.
जेव्हाही लेवी लोकांद्वारे पेटी राजाच्या अधिकाऱ्यांकडे आणली जात होती आणि त्यांनी पाहिले की, त्यात मोठ्या प्रमाणात पैसे होते, तेव्हा राजेशाही सचिव आणि मुख्य याजकाचा अधिकारी येत असत आणि पेटी रिकामी करीत आणि पुन्हा ती पेटी घेऊन तिच्या जागेवर ठेवीत. त्यांनी हे नियमितपणे केले आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले.
राजा आणि यहोयादा यांनी ते याहवेहच्या मंदिरासाठी आवश्यक ते काम करणाऱ्यांना दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी गवंडी आणि सुतार आणि लोखंडी आणि कास्यकाम करणारे कामगार ठेवले.
कामाची जबाबदारी सांभाळणारे लोक कष्टाळू होते आणि त्यांच्या हाताखाली दुरुस्तीचे काम चालू होते. त्यांनी परमेश्वराचे मंदिर त्याच्या मूळ रचनेनुसार पुन्हा बांधले आणि ते भरभक्कम केले.