मुख्य मजकुरावर जा

The First Temple बद्दल बायबलमधील वचने: Purified by Josiah

6 वचने · 72 पैलू

"The First Temple" साठी शोधा

Purified by Josiah बद्दल वचने

  1. राजाने मुख्य याजक हिल्कियाह, इतर याजक आणि मंदिराचे द्वारपाल यांना सूचना दिली की याहवेहच्या मंदिरातील, बआल व अशेरा, सूर्य, चंद्र आणि तारे यांची उपासना करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू नष्ट कराव्या. राजाने त्या सर्व वस्तू यरुशलेमा बाहेर किद्रोनच्या खोऱ्यातील एक शेतात जाळून टाकल्या आणि त्यांची राख बेथेलास नेली.

  2. यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.

  3. त्याने याहवेहच्या मंदिरातून अमंगळ अशेरामूर्ती काढून टाकली आणि ती यरुशलेमबाहेर किद्रोनच्या खोऱ्याजवळ नेली. तिथे त्याने ती पूर्ण जाळली आणि तिची राख केली आणि ती राख सामान्य लोकांच्या कबरांवर फेकून दिली.

  4. याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत.

  5. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले.

  6. यहूदीयाच्या राजांनी राजवाड्यात आहाज राजाच्या खोलीच्या छतावर उभारलेल्या वेद्याही त्याने पाडून टाकल्या. याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेहने बांधलेल्या वेद्या सुद्धा त्याने नष्ट केल्या. त्यांचा चुराडा करून त्यांची धूळ त्याने किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिली.