मुख्य मजकुरावर जा

The First Temple बद्दल बायबलमधील वचने: Being a man of war not permitted to build

7 वचने · 72 पैलू

Being a man of war not permitted to build बद्दल वचने

  1. “जा आणि माझा सेवक दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार काय?

  2. इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. मी एका ठिकाणाहून दुसरीकडे, माझे निवासस्थान म्हणून डेर्‍यातूनच फिरत आलो आहे.

  3. जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या इस्राएली लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही अधिकार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे घर का बांधले नाही” असे कधी म्हटले काय?’

  4. “तर आता माझा सेवक दावीदाला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले.

  5. जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव महान करेन.

  6. “आपणास तर माहीतच आहे की माझे पिता दावीदाला सर्व बाजूंनी युद्धाने घेरले होते आणि त्याच्या शत्रूंना याहवेहने त्याच्या पायाखाली देईपर्यंत याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावासाठी त्यांना मंदिर बांधता आले नाही.

  7. परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे.