मुख्य मजकुरावर जा

The First Temple बद्दल बायबलमधील वचने: Pillars of, with their chapiters described

11 वचने · 72 पैलू

Pillars of, with their chapiters described बद्दल वचने

  1. त्याने कास्याचे दोन खांब तयार केले, प्रत्येक खांबाची उंची अठरा हात आणि घेर बारा हात होती.

  2. खांबांच्या शिखरांवर बसविण्यासाठी त्याने कास्याचे दोन ओतीव कळस केले; प्रत्येकाची उंची पाच हात होती.

  3. खांबांवर असलेल्या प्रत्येक कळसांना सात साखळीच्या विणलेल्या जाळ्या बसविल्या होत्या.

  4. खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले.

  5. द्वारमंडपात असलेल्या खांबांवरील कळस कमळांच्या फुलांच्या आकाराचे, चार हात उंच होते.

  6. दोन्ही खांबांच्या कळसांना लागून वाटीच्या आकाराच्या जाळीभोवती, दोनशे डाळिंबाच्या रांगा केलेल्या होत्या.

  7. त्याने हे खांब मंदिराच्या द्वारमंडपाकडे ठेवले. दक्षिणेकडे ठेवलेल्या खांबाला त्याने याखीन आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले.

  8. खांबांवर असलेले कळस कमळांच्या आकाराचे होते. याप्रकारे खांबांचे काम पूर्ण झाले.

  9. मंदिराच्या समोरील भागासाठी त्याने दोन आधारस्तंभ तयार केले जे एकत्र मिळून पस्तीस हात लांब होते, प्रत्येक स्तंभावर पाच हात उंचीचा कळस होता.

  10. त्याने एकमेकात गुंफून विणलेल्या साखळ्या बनविल्या आणि त्या आधारस्तंभाच्या टोकांवर ठेवल्या. त्याने शंभर डाळिंबेसुद्धा तयार केली आणि त्यांना साखळ्यांना लागून जोडले.

  11. त्याने मंदिराच्या समोर आधारस्तंभ बांधले, एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे असे ते उभारले. दक्षिणेकडील खांबाला त्याने याखीन असे नाव दिले आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले.