मुख्य मजकुरावर जा

The First Temple बद्दल बायबलमधील वचने

365 वचने · 72 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याने मोजता येणार नाहीत इतके गंधसरूचे ओंडके पुरविले, कारण सीदोन व सोर येथील लोकांनी ते प्रचंड प्रमाणात दावीदाकडे आणले होते.

  2. दावीदाने विचार केला, “माझा पुत्र शलोमोन तरुण आणि अननुभवी आहे. याहवेहसाठी जे मंदिर बांधावयाचे आहे, ते संपूर्ण जगात अत्यंत भव्य, प्रसिद्ध व वैभवशाली झाले पाहिजे. म्हणून मी ते बांधण्याची पूर्वतयारी करेन.” त्याप्रमाणे आपल्या मृत्यूपूर्वी दावीदाने पुष्कळ तयारी केली.

  3. नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली.

  4. दावीद शलोमोनाला म्हणाला, “याहवेह परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावयाची माझी मनापासून इच्छा होती,

  5. परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे.

  6. “आता माझ्या मुला, याहवेह तुझ्याबरोबर असो आणि तुला यश प्राप्त होवो आणि तू ते बांधशील असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे याहवेह तुझ्या परमेश्वराचे भवन बांध.

  7. “मी अत्यंत परिश्रम करून याहवेहच्या मंदिरासाठी एक लाख तालांत सोने, दहा लाख तालांत चांदी जमा केली आहे. कास्य आणि लोखंड अगणित प्रमाणात आहेत आणि लाकूड आणि दगडही आहेत. आणि तुलाही त्यात भर घालता येईल.

  8. तुझ्याजवळ पुष्कळ कारागीर आहेत: दगड घडविणारे, गवंडी, सुतार आणि प्रत्येक प्रकारचे कामगार.

  9. सोने आणि चांदी, कास्य आणि लोखंड—याचे अगणित कारागीर आहेत. आता काम करण्यास सुरू कर, याहवेह तुझ्याबरोबर असो.”

  10. नंतर दावीदाने इस्राएलाच्या सर्व पुढार्‍यांना आपला पुत्र शलोमोनला या कामी मदत करण्याची आज्ञा दिली.

  11. तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे.

  12. आता तुमच्या याहवेह परमेश्वराला शोधण्याकरिता तुम्ही आपले अंतःकरण आणि आपला जीव लावा. आणि याहवेह परमेश्वराचे मंदिर बांधा म्हणजे याहवेहच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधण्यात येणार आहे, त्यात तुम्हाला याहवेहच्या कराराचा कोश आणि परमेश्वराची पवित्र पात्रे आणता येतील.”

  13. माझ्या उपलब्धींचा उपयोग करून परमेश्वराच्या मंदिरासाठी जितक्या वस्तू गोळा करता येतील, तितक्या मी केल्या आहेत—सोन्याच्या कामासाठी सोने, चांदीच्या कामासाठी चांदी, कास्याच्या कामासाठी कास्य, लोखंडाच्या कामासाठी लोखंड, लाकडाच्या कामासाठी लाकूड, गोमेद आणि जडावाच्या कामासाठी रंगीबेरंगी पाचूरत्न, उत्तम रत्ने, संगमरवरी पाषाण—मी गोळा केले आहेत.

  14. माझा भक्तिभाव माझ्या परमेश्वराच्या मंदिरावर आहे, म्हणून माझ्या व्यक्तिगत खजिन्यातून जो सोने आणि चांदीचा मी संग्रह केला आहे, तो मी परमेश्वराच्या मंदिरासाठी देतो. याव्यतिरिक्त या पवित्र मंदिरासाठी मी दिले आहे:

  15. ओफीराचे तीन हजार तालांत सोने आणि मंदिराच्या भिंती मढविण्यासाठी सात हजार तालांत शुद्ध चांदी.

  16. सर्व सोने आणि चांदीची कामे कारागिरांकडून करण्यात येतील. आता स्वेच्छेने याहवेहसाठी स्वतःचे पवित्रीकरण करण्यास कोण तयार आहे?”

  17. मग कुटुंबप्रमुख, इस्राएल गोत्राचे अधिकारी, हजार सैनिकांचे अधिकारी, आणि शंभर सैनिकांचे अधिकारी, राजाचे शासकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने दान दिले.

  18. परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी त्यांनी पाच हजार तालांत आणि दहा हजार दारिक सोने, दहा हजार तालांत चांदी, अठरा हजार तालांत कास्य आणि एक लाख तालांत लोखंड दिले.

  19. ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली.

  20. पुढाऱ्यांच्या या स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादाने सर्व लोक आनंदित झाले, कारण त्यांनी स्वयंस्फुर्तीने व पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने याहवेहच्या सेवेला दिले, दावीद राजालाही मोठा आनंद झाला.

  21. माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”

  22. शलोमोनाने याहवेहच्या नामाने मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची आज्ञा दिली.

  23. या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली.

  24. “मी जे मंदिर बांधणार आहे ते फारच भव्य होईल, कारण आमचे परमेश्वर सर्व दैवतांपेक्षा महान आहेत.

  25. “म्हणून या कामासाठी सोने, चांदी, कास्य व लोखंड या कामात एक कुशल व हुशार कारागीर, जांभळ्या, किरमिजी व निळ्या रंगांचे कापड विणण्यात आणि उत्तम नक्षीचे कोरीव काम करण्यात तरबेज कारागीर माझ्याकडे पाठवा. माझ्याजवळ यहूदीयात व यरुशलेममध्ये, माझे पिता दावीदाने निवडलेले जे निपुण कारागीर आहेत, त्यांच्याबरोबर तो काम करेल.