Skip to content

Murmuring बद्दल बायबलमधील वचने

170 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा ते कबरेत पोहोचतात, तेव्हा ते आनंदाने भरतात, आणि उल्हास पावतात.

  2. ज्याचा मार्ग गुपित आहे, ज्याला परमेश्वराने सुरक्षित ठेवले आहे अशा मनुष्याला जीवन का दिले आहे?

  3. उसासे हे माझे रोजचे अन्न झाले आहे; माझे कण्हणे पाण्याप्रमाणे ओतले जात आहे.

  4. ज्याचे मला भय वाटत होते, तेच माझ्यावर चालून आले आहे; जे भयानक तेच माझ्याकडे आले आहे.

  5. मला शांती नाही, स्वस्थता नाही; मला विश्रांती नाही, पण केवळ अस्वस्थता आहे.”

  6. परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का?

  7. तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे, तुझे डोळे असे का चमकतात,

  8. यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे?

  9. “परंतु मी तुला सांगतो, याबाबतीत तू चुकतोस, कारण परमेश्वर कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.

  10. तू त्यांच्याविरुद्ध तक्रार का करतोस की ते कोणाच्याही शब्दास प्रतिसाद देत नाही?

  11. कारण तो आपल्या पापात बंडाची भर घालतो; आमच्यामध्ये तिरस्काराने हातांनी टाळ्या वाजवितो आणि परमेश्वराविरुद्ध आपले शब्द वाढवितो.”

  12. दावीदाचे स्तोत्र. दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्‍यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.

  13. परंतु आता तुम्ही आम्हाला टाकले आहे व आमची फजिती केली; आमच्या सैन्यासोबत तुम्ही जात नाही.

  14. तुम्ही आम्हास शत्रूंपुढे पाठ फिरविण्यास लावले आहे, आणि आमचा द्वेष करणारे आम्हाला लुटतात.

  15. तुम्ही आम्हाला मेंढराप्रमाणे नष्ट होण्यासाठी सोडून दिले, आणि राष्ट्रांमध्ये आमची पांगापांग केली.

  16. तुम्ही आम्हाला कवडीमोलाने विकले; तुम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नाही.

  17. तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात.

  18. तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये उपहास असे केले आहे; लोक आमच्याकडे पाहून डोके हालवितात.

  19. सर्व दिवस मी अपमानित राहतो, आणि लज्जेने माझा चेहरा झाकला आहे.

  20. टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्‍या शब्दामुळे, शत्रू आणि सूड उगवणार्‍यांमुळे माझी विटंबना होते.

  21. आमच्यावर हे प्रसंग आले असताना आम्ही तुम्हाला विसरलो नाही; आम्ही तर तुमचा करार मोडलेला नव्हता.

  22. आम्ही तुम्हाला सोडले नाही; तुमच्या मार्गातून आमचे पाय ढळले नाही.

  23. पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले. तुम्ही आम्हाला सर्वात गडद अंधारात लपविले आहे.

  24. जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो, किंवा अन्य दैवतांपुढे हात पसरविले असते,

  25. तर परमेश्वराला ते समजले नसते काय? कारण हृदयातील प्रत्येक गुप्त विचार त्यांना माहीत असतात.