मुख्य मजकुरावर जा

Murmuring बद्दल बायबलमधील वचने: Of Israelites against Moses

12 वचने · 31 पैलू

Of Israelites against Moses बद्दल वचने

  1. ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्‍यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.”

  2. “आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली.

  3. त्या रानात सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली.

  4. इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.”

  5. आणि मोशेविरुद्ध उठले. त्यांच्याबरोबर समाजाचे सुपरिचित व मंडळीचे नेमलेले पुढारी असे दोनशे पन्नास इस्राएली पुरुष होते.

  6. ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”

  7. दूध व मध वाहत असलेल्या देशातून तू आम्हाला या रानात मारण्यास आणले ते पुरे नाही काय? आणि आता तुला आमच्यावर प्रभुत्व करावयाचे आहे!

  8. त्या शिवाय, तू आम्हाला दूध व मध वाहणार्‍या देशात आणले नाहीस किंवा आम्हाला शेतीचे व द्राक्षमळ्यांचे वतन दिले नाहीस. या पुरुषांना तू गुलाम समजतोस काय? नाही, आम्ही येणार नाही!”

  9. पण दुसर्‍याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.”

  10. त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले.

  11. लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते!

  12. याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय?