Skip to content

Murmuring बद्दल बायबलमधील वचने

170 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले:

  2. “कुठपर्यंत हा दुष्ट समुदाय माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? या कुरकुर करणाऱ्या इस्राएली लोकांच्या तक्रारी मी ऐकल्या आहे.

  3. म्हणून त्यांना सांगा, याहवेह म्हणतात, खचितच मी जिवंत आहे, जे काही तुम्ही बोलला आहात तेच मी तुम्हास करेन:

  4. याच रानात तुम्ही सर्व मरण पावाल—तुमच्यापैकी प्रत्येक जे वीस वर्षे व त्याहून अधिक वयाचे आहेत, ज्यांची जनगणनेमध्ये गणती झाली आणि ज्यांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली.

  5. ज्या देशाविषयी मी हात उंच करून म्हटले की त्यात मी तुम्हाला वसवेन, त्या देशात तुमच्यापैकी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ यांच्याशिवाय कोणीही जाणार नाही.

  6. ज्या तुमच्या लेकरांविषयी तुम्ही म्हणाला होता की, त्या देशात ते लूट असे होतील, त्यात मी त्यांना आणेन, अशासाठी की ज्या देशाचा तुम्ही धिक्कार केला त्याचा त्यांनी आनंद भोगावा.

  7. परंतु तुमच्याविषयी तर असे की, तुमचे देह याच रानात पडतील.

  8. तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील.

  9. चाळीस दिवस तुम्ही देश हेरला त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाला एक वर्ष अशी चाळीस वर्षे तुम्ही आपल्या पापाचे परिणाम भोगाल आणि माझ्या विरोधात जाणे कसे असते हे तुम्ही जाणाल.

  10. मी याहवेह हे बोललो आहे आणि जे माझ्या विरोधात एकत्र आले आहेत त्या संपूर्ण दुष्ट समाजाला मी असे निश्चितच करेन. त्यांचा शेवट ते या रानातच पाहतील; ते येथेच मरण पावतील.”

  11. म्हणून मोशेने ज्या पुरुषांना देश हेरण्यास पाठवले होते, ज्यांनी माघारी येऊन त्या देशाविषयी वाईट अहवाल पसरविला होता, संपूर्ण समाजाला मोशेविरुद्ध कुरकुर करण्यास भाग पाडले होते—

  12. हे पुरुष जे त्या देशाबद्दल वाईट अहवाल पसरविण्यास जबाबदार होते, त्यांच्यावर पीडा आली व ते याहवेहसमोर मरण पावले.

  13. आणि मोशेविरुद्ध उठले. त्यांच्याबरोबर समाजाचे सुपरिचित व मंडळीचे नेमलेले पुढारी असे दोनशे पन्नास इस्राएली पुरुष होते.

  14. ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”

  15. दूध व मध वाहत असलेल्या देशातून तू आम्हाला या रानात मारण्यास आणले ते पुरे नाही काय? आणि आता तुला आमच्यावर प्रभुत्व करावयाचे आहे!

  16. त्या शिवाय, तू आम्हाला दूध व मध वाहणार्‍या देशात आणले नाहीस किंवा आम्हाला शेतीचे व द्राक्षमळ्यांचे वतन दिले नाहीस. या पुरुषांना तू गुलाम समजतोस काय? नाही, आम्ही येणार नाही!”

  17. पण दुसर्‍याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.”

  18. “या लोकांपासून दूर व्हा म्हणजे मला त्यांचा क्षणात नाश करता येईल.” आणि ते जमिनीवर पालथे पडले.

  19. नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.”

  20. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्‍यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.”

  21. याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणेच मोशेने केले.

  22. त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले.

  23. लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते!

  24. याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय?

  25. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”