Skip to content

Murmuring बद्दल बायबलमधील वचने

170 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काईन याहवेहला म्हणाला, “मला मिळालेली शिक्षा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे.

  2. कारण तुम्ही मला माझ्या शेतातून हद्दपार केले आहे आणि तुमच्या सानिध्यापासून दूर केले आहे; मी पृथ्वीवर बेचैन असा भटकणारा होईन, जो कोणी मला पाहील, तो मला ठार करेल.”

  3. ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्‍यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.”

  4. मोशे याहवेहकडे जाऊन म्हणाला, “हे प्रभू, या लोकांवर तुम्ही अरिष्ट का आणले? यासाठीच तुम्ही मला पाठवले आहे का?

  5. मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.”

  6. ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?

  7. “आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली.

  8. त्या रानात सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली.

  9. इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.”

  10. मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.”

  11. “मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे. त्यांना सांग, ‘सायंकाळी तुम्ही मांस खाल, व सकाळी तुम्ही भाकरीने तृप्त व्हाल. मग तुम्हाला समजेल की, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

  12. तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?”

  13. पण तिथे लोकांना फारच तहान लागली होती आणि ते मोशेविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, “आम्ही व आमची मुलेबाळे व पशू तहानेने मरून जावे म्हणून तू आम्हाला इजिप्त देशाबाहेर आणलेस का?”

  14. मग असे झाले की लोक याहवेहसमोर असताना त्यांच्या कष्टांबद्दल तक्रार करू लागले. जेव्हा याहवेहने ते ऐकले तेव्हा त्यांचा राग भडकला आणि त्यांच्यामध्ये याहवेहचा अग्नी पेटला आणि छावणीच्या बाहेरील काही भाग भस्म झाला.

  15. जेव्हा लोकांनी मोशेकडे धावा केला व त्याने याहवेहकडे विनंती केली आणि अग्नी विझला.

  16. म्हणून त्या जागेचे नाव तबेरा असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता.

  17. नंतर त्यांच्याबरोबर असलेले निम्नस्तरातील मिश्र लोक अन्य भोजनाची लालसा धरू लागले आणि इस्राएली लोकही पुन्हा रडत म्हणू लागले, “आम्हाला खायला मांस असते तर किती बरे!

  18. मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता.

  19. त्यांनी विचारले, “याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?” आणि याहवेहने हे ऐकले.

  20. मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?”

  21. परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.”

  22. आणि जो देश ते हेरण्यास गेले होते त्याबद्दल त्यांनी इस्राएली लोकांमध्ये वाईट अहवाल पसरविला. ते म्हणाले, “जो देश आम्ही हेरला तो देश त्यांच्या रहिवाशांना खाऊन टाकणारा आहे. जे लोक आम्ही पाहिले ते धिप्पाड आहेत.

  23. तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”

  24. सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते!

  25. याहवेह मोशेला म्हणाले, “हे लोक कुठवर माझा तिरस्कार करणार? त्यांच्यामध्ये मी केलेले सर्व चमत्कार पाहूनही कुठवर माझ्यावर विश्वास ठेवण्यास ते नकार देतील?