Skip to content

Murmuring बद्दल बायबलमधील वचने

170 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?” कारण असे प्रश्न विचारणे हे सुज्ञान नव्हे.

  2. जेव्हा ते त्यांच्यामध्ये त्यांची संतती, माझी हस्तकृती बघतील, तेव्हा ते माझे नाव पवित्र ठेवतील; ते याकोबच्या पवित्र परमेश्वराची पवित्रता स्वीकारतील आणि इस्राएलच्या परमेश्वराचा आदर करतील.

  3. मूर्ख आत्म्याचे लोक समंजसपणा शिकतील; आणि कुरकुरणारे शिक्षण ग्रहण करतील.”

  4. हे माझ्या आई, हाय हाय, तू मला जन्म दिला, मी या सर्व राष्ट्राच्या दृष्टीने झगडा आणि विद्रोह करणारा झालो आहे! मी कोणाही कडून कर्ज घेतलेले नाही, ना कोणी माझ्याकडून घेतलेले आहे, तरीपण प्रत्येकजण मला श्राप देतात.

  5. मी जन्मलो तो दिवस शापित होवो! ज्या दिवशी आईने मला जन्म दिला तो आशीर्वादित नसो!

  6. “तुला बाळ झाले आहे—पुत्र झाला आहे!” हा संदेश ज्या मनुष्याने माझ्या पित्यास कळविला, तो मनुष्य शापित असो, याव्दारे त्यांना मोठा आनंद झाला होता.

  7. याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो. सकाळी तो शोकगीते ऐको, व दुपारी रणगर्जना.

  8. कारण त्यांनी मला गर्भाशयामध्ये मारून टाकले नाही, मी माझ्या आईच्या उदरातच मेलो असतो, तिचे गर्भाशयच माझी कबर होऊन ते विस्तृत झाले असते,

  9. मी गर्भाशयातून बाहेरच का आलो, ही संकटे व दुःख बघण्यासाठी आणि अप्रतिष्ठा सोसत जीवनाचा शेवट करण्यासाठी?

  10. आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?

  11. परंतु योनाहला हे फार चुकीचे आहे असे वाटले आणि त्याला राग आला.

  12. त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात.

  13. तेव्हा हे याहवेह, माझा जीव घ्या, कारण मला जगण्यापेक्षा मरणेच बरे आहे.”

  14. परंतु याहवेहनी उत्तर दिले, “तुला राग येणे योग्य आहे का?”

  15. मग योनाह बाहेर गेला आणि शहराच्या पूर्वेकडे बसला. तिथे त्याने एक मंडप बांधून सावलीत बसला आणि तिथून शहराचे काय होते, याची वाट बघत बसला.

  16. मग याहवेह परमेश्वराने योनाहच्या डोक्यावर छाया पडावी आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून एक वेलाचे रोपटे वाढविले. त्या रोपामुळे योनाहला खूप आनंद झाला.

  17. पण दुसर्‍या दिवशी पहाटे परमेश्वराने एक कीटक पाठविला, ज्याने रोपटे कुरतडले आणि त्यामुळे रोपटे सुकले.

  18. जेव्हा सूर्य उगवला तेव्हा परमेश्वराने पूर्वेचा एक प्रखर वारा पाठवला आणि योनाहच्या डोक्यावर सूर्याची उष्णता आदळली, ज्यामुळे तो मूर्छित झाला. त्याला मरावेसे वाटू लागले, आणि तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरण बरे.”

  19. तेव्हा परमेश्वर योनाहला म्हणाले, “रोपट्यामुळे तू रागवावेस, हे योग्य आहे का?” तो म्हणाला, “होय, तेच योग्य आहे. मला इतका राग आला आहे की मला मरावेसे वाटते.”

  20. परंतु याहवेह म्हणाले, “तू या रोपट्यासाठी चिंतित आहेस, ज्याची काळजी तू घेतली नाहीस किंवा वाढविले नाहीस. ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली.

  21. मग मी निनवेह या महान शहराची काळजी का करू नये? ज्यामध्ये एक लाख वीस हजारांहून अधिक लोक राहतात, ज्यांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या हातातील फरक देखील माहीत नाही—आणि या शहरात अनेक प्राणीही आहेत.”

  22. “तुम्ही असे म्हणाला, ‘परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. त्यांचे सर्व विधिनियम पाळण्याने किंवा सर्वसमर्थ याहवेहपुढे शोक करण्याऱ्यासारखे जाण्याने आम्हाला काय मिळते?

  23. कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.

  24. जेव्हा त्यांना ती मिळाली, तेव्हा त्यांनी धन्याविरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात केली.

  25. तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला?